शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

श्रीरामपुरातील लिलाव बंद पाडताच शेतक-यांना मिळाले गाळे, गोदाम, एक रुपयात जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:39 IST

श्रीरामपूर बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतक-यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा तसेच शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतक-यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर्णय घेतला.

श्रीरामपूर : बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतक-यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा तसेच शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतक-यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर्णय घेतला. तसेच बाजार समितीचे पदाधिकारी अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असणारे गाळे खाली करण्याचा निर्णयही समितीने घेतला.शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सकाळीच बाजार समितीच्या आवारात जमा झाले. शेतक-यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. सभापती सचिन गुजर यांच्यासह संचालकांनी प्रारंभी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतक-यांनी आक्रमक होत बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव बंद पाडला.बाजार समिती आवारातील भाजीपाला, फळ विक्रीसाठी बांधलेले गाळे आडते, व्यापा-यांना देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, बाहेरची दुकाने शेतक-यांनाच द्यावी, अशी जोरदार मागणी संघटनेकडून करण्यात आली. चर्चेअंती ती मान्य झाली.गोदामाअभावी शेतमाल खरेदी केंद्र सुरू करता येत नसताना पदाधिकारी मात्र केवळ गाळे बांधण्याचा अट्टहास करतात. बेलापूर उपआवारातील गोदाम पाडून शॉपिंग सेंटर उभारण्याचा निर्णयदेखील आंदोलनाच्या रेट्यामुळे संचालक मंडळाला रद्द करावा लागला. शेतीपूरक कामे सोडून अन्य व्यवसायासाठी दुकानांचा वापर होतो, ती खाली करावीत अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. ती संचालक मंडळाने मान्य केली.

बाजार समितीत उभारणार शीतगृह

बाजार समितीत शीतगृह (कोल्ड स्टोअर) उभारणीचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शेतक-यांना पडलेल्या दरात शेतमाल विकावा लागतो. पुढील काळात त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या कोल्ड स्टोअरमध्ये शेतक-यांना त्यांचा माल साठवता येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर