शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

पुढील आठवड्यात फिरणार राहुरी येथील‘तनपुरे’चे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:39 IST

उत्सुकता निर्माण झालेल्या राहुरीचा पडका वाडा अखेर सावरला आहे़ तीन कारखान्यांच्या कामगारांनी एकत्र येऊन आठ महिन्यांचे दुरूस्तीचे काम अथक प्रयत्नातून अवघ्या चार महीन्यात फत्ते केले आहे़ पुढील आठवड्यात राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे साखर कारखान्याचे चाक फिरणार आहे़ कार्यक्षेत्रातील उस उत्पादक किती ऊस कामध्ोनुच्या पदरात टाकतात यावर गळीत हंगामाचे यशापयश अवलंबून आहे़

भाऊसाहेब येवलेराहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या राहुरीचा पडका वाडा अखेर सावरला आहे़ तीन कारखान्यांच्या कामगारांनी एकत्र येऊन आठ महिन्यांचे दुरूस्तीचे काम अथक प्रयत्नातून अवघ्या चार महीन्यात फत्ते केले आहे़ पुढील आठवड्यात राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे साखर कारखान्याचे चाक फिरणार आहे़ कार्यक्षेत्रातील उस उत्पादक किती ऊस कामध्ोनुच्या पदरात टाकतात यावर गळीत हंगामाचे यशापयश अवलंबून आहे़ अशक्यप्राय वाटणारा तनपुरे कारखान्याचा ५८ गळीत हंगामासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे़ ५ ते ८ डिसेंबर यादरम्यान उसाची मोळी कामधेनूच्या ओटीत पडणार आहे़ तिनशे कोटीच्या आतबाहेर कर्जाचा डोलारा असलेल्या तनपुरे कारखान्याची साडेतीन वर्ष गंजलेली यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी कामगार झगडत आहेत़ गेल्या तीन महिन्यात प्रवरा, राहुरी व गणेश या कारखान्याच्या कामगारांनी बारा तास ड्युटी करून ओव्हर आॅयलिंगचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे़ सध्या टेक्नोशियनचे प्रवरेचे आठ कामगार कामावर येत आहेत़तीन वर्ष आराम करणाºया तनपुरे कारखान्याच्या तिनशेपेक्षा अधिक कामगारांना कामावर रूजू करून घेण्यात आले आहे़ कामगारांनी नटबोलट, बेअरींग, पाईपलाईन बदल, इलेक्ट्रीक दुरूस्ती आदी कामे पूर्ण केली आहेत़ दररोज सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ यावेळेत कामगार काम करीत होते़ कामगारांना दहमहा संचालक मंडळाने दहा हजार रूपये पगारही अदा केले आहेत़अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने तनपुरे कारखान्याला दहा हप्ते पाडून दिले आहेत़ ८० कोटी रूपयांचे कर्ज टप्प्याटप्याने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ ऊस उत्पादकांचे बारा कोटी एफआरपीप्रमाणे थकबाकी होती़ पहिला हप्ता उस उत्पादकांच्या खात्यात नुकताच जमाही करण्यात आला आहे़ कामगारांचे १०० कोटी रूपये देणे आहेत़ शासकीय देणी ४० कोटी आहेत़ याशिवाय अन्य व्यापारी देणी आहेत़ सुमारे तिनशे कोटीचा भार असताना राहुरी कारखान्याचे पुनर्रजीवीत करून गव्हाणीत मोळी टाकण्यात येणार आहे.

ऊस वाहतूक यंत्रणा ठप्प

राहुरी तालुक्यात ९ लाख टन ऊस असल्याचा बोलाबाल आहे़ दहा कारखाने राहुरीतून ऊस नेत आहेत़ साधारणत: अडीच लाख टन उसाचे गाळप झाले आहे़ तनपुरे कारखान्याने टायर बैलगाड्या, ट्रॅक्टर जुगाड व ट्रक मिळून  हजाराच्या पुढे वाहनांची यंत्रणा सज्ज केली आहे़ साडेचार लाख टन उसाच्या नोंदी झाल्याचा संचालक मंडळाचा दावा आहे़ डॉ़सुजय विखे यांनी गटनिहाय फिरून उसाचा जोगवा मागितला आहे़ कामधेनू सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे़ परदेशात असलेले डॉ़सुजय विखे उद्या आल्यानंतर येत्या काही दिवसात उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगाम सुरू करण्यात येणार आहे़ऊस उत्पादकांनी राहुरीलाच ऊस द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे़-उदयसिंह पाटील, अध्यक्ष, तनपुरे कारखाना 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने