निघोज-पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटीलबा कवाद व रामदास ज्ञानदेव घावटे यांनी दाखल केलेल्या फौजदारी रीट याचिकेमध्ये न्यायमूर्ती टी.वी. नलवडे व न्यायमूर्ती एम.जी. सेवलीकर यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. पारनेर येथील स्थानिक गुंडांकडून देणगीची रक्कम वसूल करून यातून पारनेर निघोज दूरक्षेत्र येथील पोलीस स्थानकाचे नूतनीकरण पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व शिवाजी कवडे यांनी केले. या नूतनीकरणाची गोळा केलेली रक्कम ही महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियमांशी विसंगत असून, अशा प्रकारे भेट स्वरूपात कुठलीही वस्तू अथवा रोख रक्कम शासकीय सेवकाने कुणाकडूनही स्वीकारणे अभिप्रेत नाही. बबन कवाद व त्यांचे सहकारी रामदास घावटे यांनी सदर बाब पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून देऊन, गाडे व कवडे यांच्या चौकशीची मागणी केली होती. याबाबत काहीच चौकशी न झाल्याने कवाद यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर आदेश होऊन गाडे व कवडे यांच्याविरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर मात्र, गाडे यांची चौकशी होऊन त्यांना ‘सक्त ताकीद’ अशी शिक्षा विभागीय चौकशीमध्ये देण्यात आली, परंतु कवडे यांच्याबद्दल शिस्तभंगाची कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. याबाबत कवाद यांनी खंडपीठात याचिका दाखल केली असता, त्यावर उपरोक्त आदेश न्यायालयाने पारित केला. याचिकाकर्ते बबन कवद यांच्या वतीने ॲड.चैतन्य धारूरकर हे काम पाहत आहेत, त्यांना ॲड.अजिंक्य मिरजगावकर यांनी सहकार्य करीत आहेत.
कसूरदार कर्मचाऱ्याविरुद्ध काय कार्यवाही केली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST