शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनिमित्त नगरमध्ये ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:41 IST

विधानसभा निवडणूक शांतता व निर्भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले असून, ११४१ जणांना आपल्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत़ 

अहमदनगर: विधानसभा निवडणूक शांतता व निर्भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले असून, ११४१ जणांना आपल्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत़ मयत झालेले व वयोवृद्ध झालेले ९३, परवाना घेऊनही शस्त्र खरेदी न करणारे ४१८ तर गुन्हा दाखल झालेल्या १० जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे शस्त्र परवाने रद्द व जमा करण्याबाबत प्रस्ताव दाखल केले होते़ पोलीस प्रशासनाच्या प्रस्तावावर निर्णय घेत जिल्हाधिकारी यांनी हे आदेश केले आहेत़ परवाने रद्द व जमा केलेल्यांमध्ये राजकीयसह विविध क्षेत्रात काम करणाºया व्यक्तिंचा समावेश आहे़ ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांच्याकडून निवडणूक काळात त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक निवडणूक काळात प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरुपात शस्त्र जमा केले जातात़ तसेच ज्यांचे वय ६५च्या पुढे आहे त्यांचे व मयत झालेल्या व्यक्तिंचेही परवाने रद्द केले जातात़ ...यांचे शस्त्र होणार जमा नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, नंदकुमार झावरे, यशवंतराव गडाख, विजय औटी, अरुण जाधव, सुनील साळवे, राजेश परजणे, सुमित कोल्हे, अशोक काळे, विजय गडाख, प्रशांत गडाख, ज्ञानदेव पठारे, अशोक सावंत, सबाजी गायकवाड, प्रभाकर कवाद, पांडुरंग अभंग, विश्वासराव गडाख, अरुण तनपुरे, चंद्रशेखर कदम, विठ्ठलराव लंघे, रामदास गोल्हार, सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, अविनाश आदिक, संजय फंड, अंजुम शेख, संजय छल्लारे, बाळासाहेब गिरमकर, भगवानराव पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख, राजेंद्र पिपाडा, प्रभाकर बोरावके, बाजीराव खेमनर, अंकुश यादव, प्रताप झिने, लहू कानडे, शिवाजीराव अनभुले, बाबासाहेब सानप, नितीन काकडे, अविनाश मोरे, वैभव जगताप, उबेद शेख, शिवाजी कराळे, नितीन जगताप, उमेश गिल्डा, राजेंद्र चोपडा, राजेश एकाडे, रफिउद्दीन शेख, सतीश लांडगे, ब्रिजलाल सारडा, चंद्रकांत गाडे, अमोल जाधव आदींचा समावेश आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक 2024