शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संपदा, यूएनडीपीचे काम सरपंचांनी बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 14:23 IST

महिला सक्षमीकरणासाठी एकात्मिक उपजिविका प्रकल्पावर दहा गावात काम करणा-या संपदा ट्रस्ट व यूएनडीपी या संस्थेने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती मिळेपर्यंत या गावातील या संस्थांनी काम बंद ठेवावे, अशी मागणी १० गावातील सरपंचांनी प्रकल्प अधिका-यांकडे केली. ही कामे शुक्रवारपासून सरपंचांनी बंद पाडली आहेत.

करंजी : महिला सक्षमीकरणासाठी एकात्मिक उपजिविका प्रकल्पावर दहा गावात काम करणा-या संपदा ट्रस्ट व यूएनडीपी या संस्थेने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती मिळेपर्यंत या गावातील या संस्थांनी काम बंद ठेवावे, अशी मागणी १० गावातील सरपंचांनी प्रकल्प अधिका-यांकडे केली. ही कामे शुक्रवारपासून सरपंचांनी बंद पाडली आहेत.सीएसआरडी फंड खर्च करण्यासाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनीने डोंगराळ भागातील दगडवाडी, भोसे, वैजूबाभूळगाव, खांडगाव, जोहारवाडी, लोहसर, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी आदी १० गावांची निवड केली. येथे साडेतेरा कोटी रुपयांचा निधी म्हणजे एका गावास १ कोटी ३५ लाखांचा निधी खर्च करण्यासाठी संपदा ट्रस्ट व यूएनडीपी या संस्थांची नेमणूक केली होती. मात्र दोन वर्षात या संस्थांनी गावच्या सरपंचांना कामाचे स्वरूप व माहिती कधीही दिली नाही. या संस्थांनी गेल्या दोन वर्षात या गावात महिला सक्षमीकरणासाठी केलेली कामे व त्याचा खर्च यांचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने या संस्थांनी केलेली कामे संशयास्पद असल्याचा सरपंचांचा आरोप आहे.या कामांची सर्व माहिती आम्हाला आठ दिवसात मिळाली पाहिजे, तोपर्यंत या दहा गावातील या प्रकल्पाचे काम थांबविण्याची मागणी अनिल गिते यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे या गावातील सरपंचांनी करून करंजी येथील कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना निवेदन दिले.यावेळी सरपंच अनिल गिते, रावसाहेब गुंजाळ, प्रदीप टेमकर, अंबादास डमाळे, बापूसाहेब गोरे, जनार्दन गिते, वैभव गिते, उद्धव गिते, भाऊसाहेब पोटे, रावसाहेब वाढेकर, डॉ. गिते, राजेंद्र दगडखैर, संपदा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक अनिरूद्ध मिरीकर, यूएनएनडीपीचे प्रकल्प अधिकारी शरद पंत यांच्यासह सर्व सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंचांना माहिती देऊ..या भागातील १० गावात संपदा ट्रस्टमार्फत काम चालू आहे. या गावात केलेल्या कामांची माहिती येत्या आठ दिवसात आपण या सर्व गावच्या सरपंचांना देवू, असे संपदा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक अनिरुद्ध मिरीकर, यूएनडीपीचे प्रकल्प अधिकारी शरद पंत यांनी सांगितले.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासAhmednagarअहमदनगर