गुजरात राज्यामध्ये रेमडेसिविर मिळत असल्याची चर्चा आहे. तेथून माल आणण्याकरिता प्रशासनाने परवानगी द्यावी. स्वखर्चाने शहरवासीयांना पुरेल एवढा साठा मिळेल त्या किमतीत आणण्याची आमची तयारी आहे. मात्र त्याकरिता आवश्यक तांत्रिक मान्यता देण्याची तयारी प्रशासनाने दाखवावी.
रेमडेसिविर आणल्यानंतर शहरातील सर्व रुग्णालयांना सारख्या प्रमाणात वितरित केले जाईल. त्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. प्रशासनाने सहकार्याची तयारी दाखवावी असे आवाहन राजेश अलघ, श्रीनिवास बिहाणी व संजय छल्लारे यांनी केले आहे.
--------
प्रभागातील काही नागरिक दगावले
नगरसेवक राजेश अलघ यांनी प्रभागातील चार ते पाच नागरिकांचा रेमडेसिविर तसेच इतर उपचारांअभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हतबल झाल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रशासन काही करत नसेल तर सामाजिक संस्थांना मदतीकरिता नियम व कायदे शिथिल करावे असे अलघ यांनी म्हटले आहे.
-----------