शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही करील त्याच्याविरुद्ध करायचे, ही महादेव जानकर यांची भूमिका - अण्णा डांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:26 IST

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. 

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केल्यानंतर अण्णा डांगे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रावर इतिहासाने कायम अन्याय केला आहे. १९९४-९५ सालापर्यंत अहिल्यादेवींची जयंती साजरी होत नव्हती. कोणाला माहितीही नव्हती. अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी साजरी व्हायची. आमचे एक धनगर समाजेच संघटन आहे. धनगर समाज महासंघ आणि यशवंत सेना असे दोन संघटन धनगर समाजात आहेत. बापू केंकरे गेल्यानंतर महादेव जानकर हे एका गटाचे प्रमुख झाले. त्यांची आमची दोस्ती आहे. मात्र आमच्याविरुद्ध करायचे, अशी त्यांची भूमिका असते. त्यानंतर ३१ मे रोजी जयंती साजरी करण्याचा निर्णय जानकर यांनी घेतला. त्यानुसार जयंती उत्सव सुरू झाला. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. राम शिंदे व महादेव जानकर दोघेही मंत्री झाले. आता कोणाच्या नेतृत्त्वाखाली जयंती उत्सव साजरा करायचा, हा प्रश्न होता. महादेव जानकर यांनी मुंबई येथुन जयंती साजरी करण्याची घोषणा केली. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मगाव आहे. येथेच जयंती साजरी करायची, असा निर्णय राम शिंदे यांनी घेतला.लॉकडाऊन असल्याने यंदा जयंती साजरी करायची नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी बंद झाली. यंदा हेलिकॉप्टरने पादुका जाणार आहेत. असे असकताना आम्ही कशी जयंती साजरी करणार. आम्ही साजरी केली असती तर तंटा-बखोडा निर्माण झाला असता.त्यामुळे सार्वजनिक स्वरुपात जयंती साजरी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे डांगे म्हणाले.