शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या लोकांचं कौतुक कशाला करायचं?; राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 16:12 IST

पुणे जिल्ह्यातून पाणी आणायचे म्हणजे जबड्यात हात घातल्यासारखे आहे. ते काम पालकमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरचे उसने नको आहे. आमचचं आम्हाला पाहिजे. बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे? अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्टवादीचे नेते शरद पवार व रोहित पवार यांचे नाव न घेता केली. 

जामखेड : पुणे जिल्ह्यातून पाणी आणायचे म्हणजे जबड्यात हात घातल्यासारखे आहे. ते काम पालकमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरचे उसने नको आहे. आमचचं आम्हाला पाहिजे. बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे? ज्यांनी दबावाचे राजकारण केले. राजकीय स्वार्थ पाहिला. जिल्ह्याचे पाणी अडवले? त्यांना लोकसभा निवडणुकीत चपराक मिळाली, अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्टÑवादीचे नेते शरद पवार व रोहित पवार यांचे नाव न घेता केली.  जामखेड नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्याभूमिपूजन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. नगर जिल्ह्याचा वापर फक्त त्यांनी राजकारणासाठी केला. पुणे जिल्ह्यात नगरचे पाणी अडवून राष्ट्रवादीने नगर जिल्ह्याची राखरांगोळी केली आहे. आता परजिल्ह्यातील पार्सल येथे नको आहे. आम्ही सक्षम आहोत. कर्जत जामखेडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करून राजकारण केले जात आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास कामे केली आहेत. राम शिंदे तुमच्याबरोबर आम्ही आहोत. त्यामुळे चिंता करू नये. परजिल्ह्यातील आक्रमण भिरकावून देऊ. जिल्ह्यावर होत असलेला अन्याय दूर करू. म्हाडाच्या पुढाकाराने पहिली योजना जामखेडला सुरू करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. राम शिंदे म्हणाले, येथे कोणी येऊन काम कमी व गप्पा जास्त मारण्याचे काम करीत आहे. यातून प्रचाराचे काम चार महिन्यांपासून काम सुरू आहे. दुर्लक्षीत भागाला यांनी सत्ता असताना कधी न्याय दिला नाही. आम्ही विकासाचा लेखाजोखा मांडला आहे. जनता सुज्ञ आहे ते योग्य निवाडा करतील, असा आशावाद व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर