शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती देसाई नगरच्या वाटेवर, स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 13:48 IST

अहमदनगर: इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अहमदनगरच्या पोलिस अधिक्षकांना भेटणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार देसाई या नगरकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

अहमदनगर: इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अहमदनगरच्या पोलिस अधिक्षकांना भेटणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार देसाई या नगरकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या असेलेल्या नगरच्या स्मिता अष्टेकर यांनी देसाई यांना नगरमध्ये पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असे खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे नगरची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.देसाई यांची वाट अडविण्यासाठी निघालेल्या अष्टेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अष्टेकर यांनी दोन दिवसांपूर्वी एका व्हीडिओद्वारे तृप्ती देसाई या नगरमध्ये कशा येतात? हिंगणघाटची घटना घडली, त्यावेळी देसाई कुठे होत्या?  वारकरी संप्रदायाचा अपमान करण्याचा त्यांना काय अधिकार?  असे आव्हान एका व्हीडिओद्लारे दिले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. इंदोरीकर यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत नगरमध्ये ठाण मांडणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर नियोजितपणे देसाई या नगरमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही पोलीस अधिक्षक कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवला आहे.