शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र जळाल्याने राहुरी तालुक्यातील दोनशे एकरावरील पिके जळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:18 IST

महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत.

राहुरी : महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत. दोनशे एकरावरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. महावितरणने लक्ष न दिल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा मंगळवारी शेतक-यांनी दिला.भिंगारकर रोहित्रावर ३५ वीज जोड आहेत. दीड महिन्यात हे रोहित्र दुस-यांदा जळाले. गेल्या तीन आठवड्यांपासून पुन्हा रोहित्र जळाल्याने शेतक-यांनी महावितरणाला रोहित्र दुरूस्ती करण्यासंदर्भात विनंती केली. शेतक-यांनी वीज देयके भरल्याची झेरॉक्सही महावितरणकडे दिली. मात्र महावितरणने लक्ष न दिल्याने पाणी असूनही शेतातील उभी पिके जळतांना बघण्याची नामुष्की शेतक-यांवर आली आहे.रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरणकडून अहवाल हवा असतो. मात्र महावितरणने अहवाल न दिल्याने नादुरूस्त रोहित्र शेतातच आहे. रोहित्र काढून नवीन रोहित्र मिळणे गरजेचे आहे. रोहित्र दुरूस्त करण्याची सुविधा राहुरी येथे नाही. त्यामुळे थेट बाभळेश्वरला रोहित्र घेऊन जावे लागते. त्यानंतर शेतक-यांना दुसरे रोहित्र दिले जाते. रोहित्र पोहच करण्यासाठी शेतक-यांनाच महावितरणच्या कर्मचा-यांना वाहन पुरवावे लागते. श्रीरामपूर, बाभळेश्वर किंवा बाभूळगाव येथे पर्यायी रोहित्र उपलब्ध होते. राहुरी येथे मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर रोहित्र जळत असताना स्थानिक पातळीवर रोहित्र उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासंदर्भात महावितरणच्या उपअभियंत्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

उसाचे पीक ३० कांडयांवर आले आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासन रोहित्र नादुरूस्त आहे. त्यामुळे पीक जळू लागले आहे. परिसरातील शेतक-यांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी वीज बिल भरूनही महावितरण दखल घेत नाही़ रोहित्र दुरूस्तीसाठी शेतक-यांना बरेच दिवस वाट पहावी लागते. दुरूस्तीसाठी राहुरी येथे सुविधा उपलब्ध पाहिजे. विजेचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.-मुरलीधर वराळे, ऊस उत्पादक शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीmahavitaranमहावितरण