सुरेश ताके, भरत आसने, देवा कोकणे, संदीप आदिक, जितेंद्र भोसले आदींच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले.
लाभक्षेत्रातील टाकळीभान अंतिम तलाव, मुठेवडगाव पाझर तलाव हे भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लो तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरण्याचे नियोजन आहे. अपुऱ्या पावसामुळे हे तलाव भरले नाहीत तर निळवंडे धरणाच्या पाण्यातून हे तलाव भरून द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ओझर ते श्रीरामपूर दरम्यान १९७० नंतर मंजूर केलेल्या अधिकृत व अनधिकृत उपसा सिंचन योजना बंद कराव्यात, या योजनांचा पाणी वापर हा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात होत आहे. भंडारदरा ते ओझर पर्यंत बंद पाईपने पाणी वहन करावे, प्रवरा नदीपात्रातील अनधिकृत बंधारे, अडथळे तसेच विहिरी उद्ध्वस्त कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. ओझर ते भंडारदरा एक्स्प्रेस फिडरवरील उपसा सिंचन योजनांची वीज जोडणी तोडावी. निळवंडे धरणाचे कालवे कार्यान्वित झाल्यानंतर
भंडारदरा लाभक्षेत्रातील पाणी वापर समीकरण बदलणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील बारमाही बागायत असलेली शेती सिंचन अभावी ओसाड होणार असल्याने विविध मागण्या करण्यात आल्याचे समिती प्रमुखांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब घोडे, गणेश ठाणगे, दत्तात्रय लिपटे, राजेंद्र खरात, अण्णासाहेब कांदळकर, महेश लवांडे, अतुल खरात उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनाही निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.
----
----