शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला हवे पाणी, चेंबरला हवे मानवी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:19 IST

शहराच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी सांडपाणी तर सांडपाण्याच्या चेंबरला माणसांचे बळी हवे आहेत़

प्रमोद आहेर शिर्डी : शहराच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी सांडपाणी तर सांडपाण्याच्या चेंबरला माणसांचे बळी हवे आहेत़ दोन घटनेत तब्बल सहा जणांचे बळी गेल्यानंतरही रविवारी पुन्हा एकाने या चेंबरमध्ये उतरण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासन हतबल आहे.नगरपंचायत, साईसंस्थानची पाणी योजना तसेच शहरातील खासगी बोअरवेल, विहिरी या माध्यमातून शहरातून रोज जवळपास एक कोटी लिटर सांडपाणी बाहेर पडते़ यातून शिर्डी, रूई व पिंपळवाडी परिसरातील एक हजार एकर जमीन बागायती झाली आहे.नगरपंचायतीने सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे़ संपूर्ण नाशिक विभागात नाशिक महापालिका वगळता केवळ शिर्डीतच असा प्रकल्प आहे़ प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी एका मोठ्या टँकमध्ये साठवले जाते़ येथून मात्र केवळ बावीस शेतकरी अधिकृत पाणी उपसा करतात़ त्यांच्याकडून नगरपंचायत प्रती हॉर्सपॉवर साडेसात हजार रूपयांप्रमाणे आकारणी करते़ यातून नगरपंचायतीला दरवर्षी पंधरा लाख रूपये मिळतात़या प्रकल्पाकडे पिंपळवाडी रोड व बनरोडने मोठ्या ड्रेनेजच्या पाईपलाईन जातात़ प्रकल्पात पाणी पोहचण्यापूर्वीच या लाईनवरील चेंबरमधून अनेक शेतकरी पानबुडी किंवा मोटारीच्या सहाय्याने पाणी उचलतात़ हे चेंबर काही ठिकाणी दहा फुटापेक्षा अधिक खोल आहे़ मोटरच्या फुटबॉलला कचरा अडकला तर मोटार किंवा फुटबॉलवर ओढून दुरूस्त करण्याऐवजी मध्ये उतरुन कचरा काढला जातो. चेंबरमध्ये पाणी अडविण्यासाठी फळ्या, वाळूच्या गोण्या टाकल्या जातात. या चेंबरमध्ये हायड्रोजन सल्फाईड, मिथेनसारखे घातक वायू असतात़ आॅक्सिजनअभावी माणूस बेशुद्ध पडू शकतो़ यातूनच दोन्ही अपघात झाले़ सांडपाण्यातील विषारी द्रव्यामुळे शेती कायमस्वरूपी नापीक होण्याची भीती आहे़ परिसरातील विहिरीतही हे पाणी उतरते. या सांडपाण्यावर होणारा भाजीपाला, फळे तसेच वापरातील पाणी मानवी आरोग्याकरिता अपायकारक आहे का? याबाबत कृषी विभाग व नगरपंचायतीने संशोधन करून शेतकºयांना मार्गदर्शन करायला हवे़पाणी उचलण्याचा प्रस्ताव शासनाकडेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेनुसार प्रकल्पात शुद्ध झालेले पाणी पंपाने उचलून शहराच्या पश्चिम भागात नेऊन ते पाटबंधारे विभागाच्या दोन कालव्याद्वारे शहरात बारमाही फिरवण्यात येईल़ यासाठी नगरपंचायतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे़ या कालव्यामुळे शहरात भूजल पातळी उंचावेल़ हे पाणी नाममात्र शुल्क देऊन शेतकरी अधिकृत घेऊ शकतील, असे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी