शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 17:16 IST

पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत, जामखेड मतदारसंघात सर्वाधिक जलयुक्त शिवार योजनेची कामे होऊनही दोन्ही तालुक्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे़

साहेबराव नरसाळे अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत, जामखेड मतदारसंघात सर्वाधिक जलयुक्त शिवार योजनेची कामे होऊनही दोन्ही तालुक्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे़ पाण्याचे उद्भव कोरडे पडल्यामुळे तब्बल १७७ पाणी योजना बंद पडल्या असून, दोन्ही तालुके टँकरच्या पाण्यावर जगत आहेत़कर्जत तालुक्यात १२८ पाणी योजना असून, त्यापैकी तब्बल ११४ पाणी योजना बंद आहेत़ विशेष म्हणजे कर्जत शहरासाठी २८ कोटी ५० हजार रुपयांची पाणी योजना राबवूनही लोकांना अद्याप पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही़ या योजनेला पिवळसर पाणी येत असल्यामुळे नागरिक ते पाणी पीत नाहीत़ काही नागरिक जारचे तर काही नागरिक टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत़ कर्जत तालुक्यात शासनाकडून ८५ टँकर सुरु असून, राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीकडून २५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो़जामखेड तालुक्यात १०६ पैकी ६३ पाणी योजना बंद आहेत़ विशेष म्हणजे शहरालाही टँकरचेच पाणी पिण्याची वेळ आली आहे़ जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणी पुरवठा होत होता़ मात्र, तलाव कोरडा पडल्यामुळे ही योजनाही बंद आहे़ जामखेड शहरात २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनेच्या साठवण टाकीत पाणी सोडले जाते व नंतर ते नळाद्वारे शहरात पुरविले जाते़ शहराजवळील वाड्यांना १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो़ जामखेड तालुक्यात एकूण ८६ टँकर सुरु आहेत़ त्याशिवाय बारामती अ‍ॅग्रो कंपनीकडूनही २५ टँकर सुरु करण्यात आले आहेत़जलयुक्त शिवार योजनेतून कर्जत, जामखेड तालुक्यात सर्वाधिक कामे केल्याचे पालकमंत्री राम शिंदे जाहीर सभांमधून सांगत आहेत़ पाऊस पडल्यानंतर ड्रोनद्वारे फोटो काढून कर्जत तालुका पाणीदार झाल्याचे दाखविण्यात आले होते़ हे जलयुक्त शिवार योजनेचे हे यश असल्याचे व पाणी पातळी वाढल्याचेही त्यावेळी पालकमंत्री सांगत होते़ मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीसच कर्जत, जामखेडचे सर्वाधिक उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे दोन्ही तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवत आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडKarjatकर्जत