अहमदनगर : नागापूर, बोल्हेगाव परिसरातील फेज-२ च्या जलवाहिनीची चाचणी झाली असून, जलकुंभाच्या साफसफाईचे कामही पूर्ण झाले आहे. नागरिकांनी नळ जोडणीचे पैसे भरून एक महिना उलटून गेला. मात्र, अद्याप या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात तातडीने फेज-२ द्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सेनेचे नगरसेवक अशोक बडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नागापूर, बोल्हेगाव पाणीप्रश्नी सेनेचे नगरसेवक अशोक बडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक दत्ता सप्रे आदी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक- ७ मधील नागापूर, पितळे वसाहत, आदर्शनगर, गुरुकृपा वसाहत, ओंकार वसाहत, माताजीनगर, सोनचाफा वसाहत, रेणुकानगर, बालाजीनगर, संतराम नागरगोजे भवन, भारतनगर, गांधीनगर, बोल्हेगाव फाटा, विजयनर, भोर वसाहत, भंडारी वसाहत, अक्षय वसाहत, शुभम वसाहत, गणेश पार्क, गणेश चौक, शिंदे वसाहत, सौरभ वसाहत, कातोरे वस्ती, राघवेंद्रस्वामी मंदिर, राजमाता वसाहत, श्रीकृष्णनगर, बोल्हेगाव, नवनाथनगर, सनफार्मा विद्यालय, साईराजनगर भागातील फेजचे काम पूर्ण झालेले आहे; परंतु या योजनेद्वारे पाणी दिले जात नाही. अवेळी पाणीपुवठा होत असल्याने नागरिकांची गैरसाेय होत असून, या भागात तातडीने फेज-२ द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बडे यांनी केली आहे.
..
सूचना फोटो आहे.