अहमदनगर : शहरामध्ये सथ्था कॉलनी परिसरात अंगावर भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रोहन विजय फुलारे(वय-२२, बुरुडगाव, ता.नगर), राहुल विजय फुलारे( वय-२६, बुरुडगाव, ता.नगर), गोविंद शंकर शिंदे(वय-३२, बुरुडगाव) असे मृत कामगारांची नावे आहेत. फुलारे हे सख्खे बंधू असून शिंदे त्यांचे मेहुणे आहेत. घराचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र या इमारतीभोवची जुनेच कंपाऊंड होते. या भिंतीला नव्याने प्लास्टर करण्यासाठी जुने प्लास्टर ड्रील मशीनने काढण्याचे काम तिघे करत होते. या ड्रील मशीनच्या हाद-याने शेजारील भिंत कोसळली. अंगावर भिंत कोसळल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
अहमदनगर शहरात भिंत कोसळली : दोन भावांसह मेहुण्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:16 IST