अहमदनगर : महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे यांनी विधीवत पूजा करत पदभार स्वीकारला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाकळे आणि ढोणे यांनी पदभार स्वीकारला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने अहमदनगर महापालिकेत पहिल्यांदा भाजपचा महापौर व उपमहापौर झाला. आज विधीवत मंत्र्त्रोच्चार करत वाकळे यांनी पदभार स्वीकारला. लक्ष्मीकांत देवदास कापडे यांनी पूजा केली. महापौरांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून अभिषेक केला. त्यानंतर वाकळे खुर्चीवर विराजमान झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी उपस्थित होते. या पूजेनंतर खासदार गांधी यांनी वाकळे यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचेही मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.मोजकेच नगरसेवक उपस्थितपदभार स्वीकारताना राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक गैरहजर होते. शिवसेनेचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवकही गैरहजर होते.
विधीवत पूजा करत वाकळे यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:52 IST