शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

माणुसकीचा धर्म सांगणारे विवेकानंद पहिले संन्याशी

By admin | Updated: December 15, 2015 23:13 IST

अहमदनगर : स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व ध्यानासक्त बालक, ध्येयासक्त युवक व धर्मासक्त प्रौढ असे होते. परमेश्वराची भेट घ्यायची, या एकाच ध्येयाने विवेकानंद त्यांचे अवघे आयुष्य जगले.

अहमदनगर : स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व ध्यानासक्त बालक, ध्येयासक्त युवक व धर्मासक्त प्रौढ असे होते. परमेश्वराची भेट घ्यायची, या एकाच ध्येयाने विवेकानंद त्यांचे अवघे आयुष्य जगले. मानवता हाच धर्म आहे, अशी शिकवण हिंदू धर्माने दिल्याचे वैश्विक पातळीवर सांगणारे विवेकानंद हे पहिले संन्याशी होते, असे प्रतिपादन अभिनेते व अभ्यासक राहुल सोलापूरकर यांनी केले. संपदा विद्या प्रतिष्ठानतर्फे सातव्या ज्ञानसंपदा व्याख्यानमालेचा सोमवारी सावेडीत प्रारंभ झाला. या मालिकेतील पहिले पुष्प सोलापूरकर यांनी ‘संन्याशी योध्दा - स्वामी विवेकानंद’ या विषयावर गुंफले. संस्थेचे विश्वस्त मिलींद गंधे यांनी प्रास्ताविक केले. अशोक सोनवणे यांनी वक्त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर यांनी परिचय करून दिला. उज्वला पंडित यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण बजाज, उपाध्यक्ष भगत, मानद सचिव अरूण कुलकर्णी, स्कूल कमिटी चेअरमन कारभारी भिंगारे, अविनाश बोपर्डीकर, विनोद बजाज, श्रीहरी टिपुगडे आदी उपस्थित होते. सोलापूरकर म्हणाले, बालवयात सवंगड्यांना खेळ म्हणून ध्यान लावू म्हणणाऱ्या नरेंद्राने त्या वयात माणसासारख्या हाडामांसाच्या परमेश्वराला भेटण्याचा ध्यास घेतला. साक्षात काली मातेच्या दर्शनानंतर गुरू आज्ञेनुसार हिंदुस्थानची परिक्रमा केली. या परिक्रमेत त्यांना दरिद्री नारायणाचे दर्शन घडले. पदवीचे शिक्षण घेताना तत्वज्ञानाचे प्राध्यापक हेस्टिंग्ज यांच्याकडून नरेंद्र यांचा गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याशी परिचय झाला. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला परमेश्वराची प्रथम अनुभूती दिली आणि जीवनाचे उद्दिष्ट समजावून सांगितले. ­ या कालावधीत कुंटुंबाची जबाबदारी असतानाही नरेंद्रांनी काली मातेकडे ज्ञान, वैराग्य व भक्तीची मागणी केली. येथूनच नरेंद्राचा स्वामी विवेकानंदापर्यंतचा प्रवास वेगात सुरू झाला. उज्वला पंडित यांनी आभार मानले. बुधवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजता कवी प्रवीण दवणे यांचे ‘अध्यापन आणि नवर्निमिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. (प्रतिनिधी)