शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

२७ देशातील भाविकांचे विश्वव्रिकमी महापारायण,पाच लाखाहून अधिक भाविकांचा सहभाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 18:48 IST

शिर्डी: कोरोनाचा नायनाट व्हावा, योध्द्यांना बळ मिळण्यासाठी साईनिर्माणच्या वतीने महिनाभरापासून सुरु असलेल्या घर तेथे साईचरित्र या उपक्रमात २७ देशातील पाच लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. गुरुवारी विश्वव्रिकमी महापारायण केले.

शिर्डी: कोरोनाचा नायनाट व्हावा, योध्द्यांना बळ मिळण्यासाठी साईनिर्माणच्या वतीने महिनाभरापासून सुरु असलेल्या घर तेथे साईचरित्र या उपक्रमात २७ देशातील पाच लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. गुरुवारी विश्वव्रिकमी महापारायण केले.जगात कोरोनाच्या संकटाने कहर केला आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. मात्र तरीही कोरोना संकट गडद होत चालले आहे. कोरोना लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी हे कोरोना योध्दे रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. औषध शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विज्ञानाला आध्यात्माची जोड देत या उपक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आले होते. पहिल्या गुरुवारी शिर्डी, त्यानंतर राहाता तालुका, नगर जिल्हा, महाराष्ट्र व भारतासह संपूर्ण जगात भाविकांना घरोघरी पारायण करण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियाद्वारे देश विदेशातील भाविक, शिर्डीत येणारे पदयात्री, गावोगावी केलेल्या पारायण सोहळ्याची भाविक यांच्याशी संपर्क साधला. अमेरिका, युनायटेड किंग्डम, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान, थायलंड, मलेशिया, केनिया, तांजाविया, युगांडा, श्रीलंका, नेपाल, आखाती राष्ट्रे, ओमान, कतार, जर्मनी, तैवान, बार्बाडोस, मॉरिशस, फिजी, इंडोनेशिया, सिंगापुर यासह एकूण 27 देशातील भाविकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. पाच लाखाहून अधिक भाविकांनी विश्वविक्रमी महापारायण करत कोरोना संकट निवारणासाठी साईबाबांना साकडे घालत कोरोना योध्दांना उत्तम आरोग्य लाभावे. त्यांना काम करण्यासाठी बळ प्राप्त व्हावे यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. साईनिर्माणचे विजयराव कोते, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, पंकज लोढा यांनी हा उपक्रम राबविला.------------

 

कोरोना संकट नष्ट होऊन संपूर्ण जगात विश्वशांती नांदावे. कोरोना योध्द्यांचे आत्मबल वाढावे. यासाठी राबविण्यात आलेल्या घरोघरी साईचरित्र पारायण उपक्रमास भरभरुन भाविकांचा प्रतिसाद मिळाला. जगातील पाच लाखाहून अधिक भाविकांनी यात स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला .-विजय कोते, अध्यक्ष साईनिर्माण---

घरोघरी साईचरित्र पारायण उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. संपुर्ण जगातील भाविकांनी यात सहभाग घेत महापारायण केले.-पंकज लोढा, अध्यक्ष, साईसंदेश ग्रुप.