शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी; तीन जखमी, ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:41 IST

शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या वादातून राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ९ जून रोजी सायंकाळी घडली आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राहुरी : शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या वादातून राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ९ जून रोजी सायंकाळी घडली आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे ९ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजेदरम्यान दोन गटात शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी एका गटाने सिनेस्टाईलने हातात लोखंडी कोयता, लोखंडी गज, लाकडी दांडे हातात घेऊन एका कुटूंबावर सशस्त्र हल्ला केला. यात तीन जण जखमी झाले आहेत. 

याबाबत संजय विठ्ठल कातोरे (रा.शिलेगाव) यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल अशोक तागड, दादासाहेब अशोक तागड (दोघे रा. शिलेगाव), मच्छिंद्र विश्वनाथ म्हसे, दत्तात्रय विश्वनाथ म्हसे, महेश गंगाराम म्हसे, अप्पासाहेब भानुदास म्हसे (सर्व रा.कोंढवड) या सहा जणांविरोधात जबरदस्त हाणामारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल हे करीत आहेत. 

तर दुसरी फिर्याद रात्री उशीरा दाखल झाली आहे. मच्छिंद्र म्हसे (रा. कोंढवड ) यांच्या फिर्यादीवरून विजय विठ्ठल कातोरे, संजय विठ्ठल कातोरे, अजय विठ्ठल कातोरे या तिघांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित राठोड हे करीत आहे. 

राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात दोन्ही गटातील एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील सर्व आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी