शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन; संगमनेर शहरातील दुकान सील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 15:38 IST

संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक परिसरातील एक दुकान संगमनेर नगरपालिका प्रशासनाने सील केले. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

संगमनेर : शहरासह तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण गावात प्रशासनाने हॉटस्पॉट जाहिर केला आहे. या काळात येथील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन करून दुकान सुरू ठेवल्याने शहरातील चंद्रशेखर चौक परिसरातील एक दुकान संगमनेर नगरपालिका प्रशासनाने सील केले. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.  धांदरफळ बुद्रूक येथील वयोवृध्द व्यक्तीचा कोरोनाची लागण होवून मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील सात जणांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कुरण रस्ता परिसरातील एका वयोवृध्द महिलेसही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या आदेशान्वये संगमनेर शहरासह तालुक्यातील धांदरफळ बु्रदूक व कुरण गावात ९ ते २३ मेपर्यंत हॉटस्पॉट जाहिर करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शहरातील सर्वच प्रभागात नगरपारिषदेच्या माध्यमातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, औषधे, भाजीपाला, दूध घरपोहोच करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून चंद्रशेखर चौकातील दत्ता प्रोव्हिजन हे दुकान सुरू होते. तेथे नागरिकांची गर्दी झाली होती. याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांना कळविली. या दुकानावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेच्या पथकास दिले. पथकाने तात्काळ तेथे जात कारवाई करीत हे दुकान सील केले. राजेंद्र सुरग, सतिष बुरूंगुले, सुरेश सातपुते, नाजीर पठाण, रफिक बागवान, अनिल काळण, भीमाशंकर वर्पे, गौरव मंत्री आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेर