शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पाथर्डी तालुक्यातील गावांना मिळेनात ग्रामसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST

कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील आगसखांड, हातराळ, वाळूंज, चितळी, जोडमोहोज, शिरसाठवाडी, दैत्यनांदूर या गावातील कारभार ग्रामसेविकांविना सुरू आहे. पंचायत समिती ...

कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील आगसखांड, हातराळ, वाळूंज, चितळी, जोडमोहोज, शिरसाठवाडी, दैत्यनांदूर या गावातील कारभार ग्रामसेविकांविना सुरू आहे. पंचायत समिती अधिकारी, ग्रामपंचायत, सरपंच, सभापती यांच्यातील मतभेदांमुळे ग्रामसेवकांच्या नियुक्त्या रखडल्याची चर्चा आहे.

कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये येणाऱ्या या गावातील ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. नव्याने येणाऱ्या नियुक्ती देण्यात आलेल्या ग्रामसेवकांना येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा विरोध आहे. पंचायत समितीकडून ग्रामसेवक बदलून मिळण्यासाठीचे लेखी आश्वासन दिलेले आहे. मात्र तरीही ते मिळत नाहीत. वास्तविक सरपंच हा त्या गावातील प्रमुख असून ग्रामसेवक हा सचिव म्हणून काम पाहतो. त्यांचे काम सुरळीत चालण्यासाठी या दोघांमध्ये समन्वय गरजेचा आहे. एखाद्या गावातील ग्रामसेवक पंचायत समितीकडून बदलून मागितला तर तो मिळाला पाहिजे, असे मत सरपंच यांचे आहे.

असे होत नसल्याने पंचायत समितीतील अधिकारी मनमानी कारभार करत असून सरपंचांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचे काम केले जात असल्याचे सरपंच व पदाधिकारी यांच्याकडून बोलले जात आहे‍. त्यामुळे या गावातील जुन्या ग्रामसेवकांची प्रशासकीय बदली होऊनही त्यांना नवीन गावांचे चार्ज घेता येत नाहीत. त्यापुढील ग्रामसेवकांना पुढील गावे अशा पद्धतीने एकूण सर्व बदल्यांचा प्रकार पहावयास मिळत आहे.

-----

काही गावांमधून ग्रामसेवक नको असल्याबाबत तक्रारी येत आहेत. सरपंच लोकप्रतिनिधी असून ग्रामविस्तार अधिकारी यांनी याबाबत समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही.

-सुनीता दौंड,

सभापती, पंचायत समिती, पाथर्डी