शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यात चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 20:05 IST

अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात  मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देअकलापूर येथील घटनाएअरगन, तलवार, कोयता जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबोटा : अहमदनगरमधीलसंगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात  मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित चोरटे हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अकलापूर, मुंजेवाडी परिसरातील मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी भाऊसाहेब भीमाजी जाधव यांच्या घरात जाऊन त्यांना तीक्ष्ण हत्याराने हातावर मारहाण करीत घरातील पत्र्याची पेटी पळवून नेली. जाधव यांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.दरम्यान ग्रामस्थ पकडणार या भितीने चोरट्यांनी तेथील डोंगराचे कपारीचा आधार घेतला. मंगळवारी सकाळी या डोंगरावर चार जण संशयितपणे जात असल्याचे एकाच्या निदर्शनास आले. ही बाब ग्रामस्थांना सांगण्यात आल्यावर ग्रामस्थ डोंगराजवळ जमा झाले. त्यांनी या चारही जणांना शिताफीने पकडले. ग्रामस्थांसमोर त्यांनी भाऊसाहेब जाधव यांना मारहाण करून चोरी केल्याचे सांगितले. घारगाव पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार हे घटनास्थळी आले. त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. संतोष शिवाजी जाधव (रा. आभाळवाडी), संतोष दत्तू धांडे (श्रीगोंदा), शरद बन्सी निचीत (वडनेर बुद्रुक,ता. शिरुर), चंदर दादाभाऊ गाडे (जवळा, ता. पारनेर) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर अनेक चोरीचे गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.चोरट्यांकडे सापडली हत्यारेअकलापूर येथे पकडलेल्या चोरट्यांकडे एअरगन, तलवार व कोयता ही हत्यारे व मिरची पूड घारगाव पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले आहे. या चोरट्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. अनेक चोरीच्या घटना या चोरट्यांकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर