शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात दिव्यांगांचे होणार गावनिहाय सर्वेक्षण; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती

By साहेबराव नरसाळे | Updated: June 6, 2023 17:32 IST

शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे

अहमदनगर : जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी दिव्यांग व्‍यक्‍तींचे गाव, वाडीनिहाय सर्व्हेक्षण विहित वेळेत पूर्ण करण्यात यावे. या कामामध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य यंत्रणा तसेच आयसीडीएस यांचा सहभाग घेण्यात यावा. दिव्यांगांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण होईल, यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” या अभियानाबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ गुरवले, जिल्‍हा दिव्यांग निर्मूलन केंद्राचे समन्वयक दीपक अनाप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सालीमठ म्हणाले, दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींबरोबरच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र यासारखी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत यासाठी जिल्हास्तरीय शिबिराच्या आयोजनाचे सर्व विभागांनी एकत्रितपणे व समन्वय साधत काटेकार नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.