शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

थर्ड डिग्रीच्या दहशतीखाली गाव

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलीत कुटुंबातील तीघांच्या हत्या प्रकरणात पोलीस विनाकारण गावातील व्यक्तींना रात्री अपरात्री उचलतात व थर्ड डिग्री लावून अमानुषपणे मारहाण करतात

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलीत कुटुंबातील तीघांच्या हत्या प्रकरणात पोलीस विनाकारण गावातील व्यक्तींना रात्री अपरात्री उचलतात व थर्ड डिग्री लावून अमानुषपणे मारहाण करतात या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत याचा त्रास महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडली़ ग्रामस्थांची चौकशी गावातच करावी, अशी मागणी केली़ जवखेडे खालसा येथे मागील आठवड्यात जाधव या कुटुंबातील तीघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली़ याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. दलीत चळवळीतील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडे खालसा येथे भेट देवून आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी करीत पोलिसांवर दबाव आणला़ त्यामुळे पोलिसांनी गावातील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली़ पोलिसांनी गावातील सुमारे ५० संशयितांना ताब्यात घेतले़ पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या तक्रारीनंतर ग्रामस्थांनी बुधवारी (दि़२९) महादेव मंदिरात बैठक घेतली़ यावेळी ज्येष्ठ नेते उध्ववराव वाघ, अ‍ॅड.वैभव आंधळे, चारूदत्त वाघ, अमोल वाघ, सुरेश वाघ आदींसह सुमारे दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते़ यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.बैठकीत ग्रामस्थांनी सांगितले की, पोलीस रात्री-अपरात्री येऊन ताब्यात घेतात, मारहाण करतात, थर्ड डिग्री लावण्याचा दम देतात़ त्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे़ या घटनेचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी आमची इच्छा आहे व मागणीही आहे. परंतु गावकऱ्यांना पोलीस अमानुषपणे मारहान करीत आहेत़ त्याबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला़ महिलांनीही तीव्र शब्दात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शशीराज पाटोळे, पो.नि.सुभाष अनमुलवार आदी उपस्थित होते. यापुढे ग्रामस्थांची चौकशी गावातच होईल, तसेच आमच्या परवानगीशिवाय कोणालाही ताब्यात घेतले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी ग्रामस्थांना दिले. (तालुका प्रतिनिधी)