गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, निवासी नायब तहसीलदार अभिजित बारवकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडीसेविका, आशासेविका व पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
बैठकीमध्ये रुग्णांचे गृहविलगीकरण पूर्णतः बंद करण्यात यावे, प्रत्येक गावात विलगीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे, विलगीकरण केंद्रातील रुग्णांचे आशासेविका व अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात यावी. लक्षणे असणाऱ्या बाधित रुग्णांना कोविड सेंटरला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामसमितीमार्फत गावात दवंडी देऊन जनजागृती करण्यात यावी तसेच कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन नोंद ठेवावी. कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात याव्यात. ही कामे ग्रामस्तरीय समितीने करावयाची आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर तसेच कोरोनाबाधित रुग्ण गावात फिरणार नाहीत, यासाठी ग्रामसमितीने कारवाई करायची आहे. समितीच्या कामकाजाचा आढावा पर्यवेक्षकांमार्फत घेण्यात येणार आहे.
ग्रामस्तरीय समितीने करावयाच्या कामाबाबत गटविकास अधिकारी घाडगे यांनी माहिती दिली.
तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे म्हणाल्या, तालुक्यात सध्या १ हजार ३१६ रुग्ण सक्रिय असून दरदिवशी ३०० च्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असून आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तालुक्यात सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत.
.......
नियम पाळून कोरोनाची लढाई जिंकू. सर्वांनी मास्कचा वापर करावा. सामाजिक आंतर राखावे. सतत हात स्वच्छ धुवावेत. गर्दी टाळावी. आपण नियमांचे पालन करून कोरोनाची लढाई जिंकू.
-उमेश पाटील (तहसीलदार नगर)
......
विलगीकरण कक्षासाठी गावांना निधी द्या
नगर तालुक्यात प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे आदेश तालुका प्रशासनाने दिले. मात्र, त्यासाठी भौतिक व इतर सुविधा पुरविण्यासाठी गावांना मोठा आर्थिक खर्च येणार आहे. त्या खर्चाची तरतूद कशी करायची, असा प्रश्न तालुक्यातील सरपंचांनी उपस्थित केला आहे.
.......
नगर तालुक्यात जी ऑनलाइन बैठक झाली, त्यामध्ये सरपंचांना विश्वासात घेतले नाही. अडचणी विचारल्या नाहीत. विलगीकरण कक्ष उभारताना कुठे उभारायचा. त्यासाठी वीज पाणी, बेड कसे उपलब्ध करायचे. त्याचा खर्च कसा करायचा, हे काहीच सांगितले नाही. जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी. शासनाने विलगीकरणासाठी खर्च निधी उपलब्ध करून द्यावा. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग यांच्या मदतीला शिक्षक, अंगणवाडीसेविका यांची मदत गरजेची आहे. -
आबासाहेब सोनवणे, सरपंच, हिंगणगाव, तालुकाध्यक्ष सरपंच परिषद
...................