या ग्राम सुरक्षा मोबाईल ॲपव्दारे गावातील रेशन, रॉकेल, ग्रामपंचायतीमधील सरकारी योजना, ग्रामसभा, सरकारी कार्यालयांकडून दिली जाणारी माहिती तसेच गावामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चोरी, दरोडा, आग लागणे, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, दागिने चोरीला जाणे, दुकान फोडणे, बिबट्याचा हल्ला, विषारी सर्पदंश, पिसाळलेला कुत्रा गावांमध्ये येणे, निधन वार्ता इत्यादी घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेची जास्तीत जास्त मदत होणार आहे.
या यंत्रणेत सरपंच लताबाई विठ्ठल अभंग, उपसरपंच शुभांगी सोमनाथ कचरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब आरगडे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथराव कावरे, मच्छिंद्र जाधव, आशाबाई रामदास खराडे, हकीमाबी लालाभाई शेख, रज्जाक इनामदार, सुनील गोर्डे, अनुराधा निकम, भाऊसाहेब फोलाने, इकबाल इनामदार, सुजाता देशमुख, दौलतराव देशमुख, छाया गोर्डे, शिवगंगा सदावर्ते, स्वस्त धान्य दुकानदार अमोल पंडित, कामगार तलाठी प्रदीप चव्हाण, कोतवाल जॉय ओहळ, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन गोर्डे आदींचा समावेश आहे.