शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राळेगणसिद्धी ‘ऊर्जा’ देणारे गाव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:08 IST

ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अहमदनगर : ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे शनिवारी ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पा’चे भूमिपूजन, ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘सरपंच मेळावा’ झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, सौरउर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या रूपाने देशाला ग्रामविकासाची दिशा मिळाली. तीन महिन्यांत राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे शेतकºयांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांवर अधिक आहे. अवैध दारूबाबत जनजागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णांनी आश्वस्त केले आहे.आतापर्यंत विहीर पुनर्भरण व्हायचे, परंतु आता अख्ख्या पाणलोटाचेच पुनर्भरण हा अण्णांचा मंत्र घेऊन भविष्यात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हजारे म्हणाले, गावागावांतील व्यसनाधीनता संपवायची असेल, तर अवैध दारूविक्री रोखली पाहिजे. अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने हे शक्य होईल. ग्रामरक्षक दल कायद्याबाबत छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यांनीही माहिती मागवून घेतली आहे.सभेत गोंधळसभा सुरू असताना एक अपंग तरुण रोजगार मिळत नसल्याबाबतचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने त्याने सुरक्षाकडे तोडून व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ सभेत गोंधळ झाला. सभेनंतर संबंधित तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. त्याचे निवेदन घेऊन त्याला सोडून दिले.