शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सोनई-करजगावसह 18 गावाचे ग्रामस्थ बसले नगरला उपोषणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:17 IST

सोनई - करजगाव सह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी. ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी.

अहमदनगर : सोनई - करजगाव सह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी. ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी. योजनेचे काम पूर्ण करून 1 वर्ष योजना प्राधिकरणाने चालवावी या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या आॅफिस समोर उपोषणाला बसले आहेत.या सर्व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुलै 2019 पासून बंद केलेली पाणी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी गडाख यांच्या समवेत अठरा गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सोनई येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यात जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांनी याबाबत लेखी दिले होते परंतु यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ नगर येथे उपोषणाला बसलेले आहेत. या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.प्राधिकरणाच्या आॅफिसमध्ये उपोषणकर्ते आले त्यांनी तेथे ठिय्या मांडला व टाळ, मृदंगसह जप चालू केला. अधिकारी, ठेकेदार व नेवाशाचे आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित, दगडुभाई इनामदार, सुभाष जाधव, बाळासाहेब वायभासे, केशव औटी, रमेश पुंड, गोरख माकोने, चंद्रकांत टेमक, अण्णासाहेब मकोने, 18 गावातील सरपंच, उपसरपंच, क्रांतिकारी पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .राहुरी तालुक्यातील 3 गावांना दिलेले अनधिकृतपणे कनेक्शन दिल्यामुळे नेवासा तालुक्यातील 18 गावांची पाणी योजना अडचणीत आली आहे. तसेच पूर्ण दाबाने पाणी येत नाही व टाक्या भरत नाही राहुरीचे गावे जोडण्यासाठी नेवशाच्या लोकप्रतिनिधींनी लेखी समंती दिली आहे. या योजनेचे छोटे मोठे कामे अपूर्ण असतांनाही ठेकेदाराला पेमेंट दिले गेले आहे यात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चवकशी करण्याची मागणी आहे. कामे अपूर्ण असतांना योजना हस्ततारण करण्याचा घाट घातला जात असल्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा