शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : नागवडेंच्या भाजप प्रवेशासाठी विखेंची व्यूव्हरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 18:49 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यूव्हरचना आखल्याचे समजते.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यूव्हरचना आखल्याचे समजते. यासाठी त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनाही विश्वासात घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे समर्थक त्यांच्यापासून दूर जाणार असे चित्र आहे.बुधवारी राहाता येथे डॉ. सुजय विखे यांनी श्रीगोंद्यातील भगवानराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, अनिल पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, विठ्ठलराव काकडे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली. या बैठकीत नागवडेंच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा झाल्याचे समजते. विखे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांना एकत्र बसवून त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करावी. आमची काहीच हरकत नाही, असे श्रीगोंद्यातील नेते यावेळी म्हणाल्याचे समजते.नागवडे यांनी भाजप प्रवेश केल्यास श्रीगोंद्याच्या निवडणूक आखाड्यात ४९ वर्षानंतर पाचपुते-नागवडे हे एकाच पक्षात दिसणार आहेत. स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नागवडे कारखाना विश्रामगृहावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार विखे व नागवडे यांच्यात चर्चा घडवून आणली होती. विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंना मदत आणि नागवडे साखर कारखाना निवडणुकीत नागवडेंना मदत करण्याच्या मुद्यावर दोन्ही गटाचे मनोमिलन होणार असल्याचे समजते. मात्र दोन दिवसात सर्व राजकिय वाटाघाटी झाल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे