शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

VIDEO : नगरच्या भुईकोट किल्ल्यात होता पंडित नेहरूंचा अडीच वर्ष मुक्काम

By admin | Updated: May 26, 2017 21:29 IST

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील ...

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड

अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान होण्याच्या आधी दहा वर्षे म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सुमारे अडीच वर्षांचा काळ या किल्ल्यात गेला.बंदिवासाच्या काळातच नेहरू यांनी जगप्रसिद्ध ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ हा ग्रंथ भुईकोट किल्ल्यात शब्दबद्ध केला. त्या ग्रंथाची १ हजार पाने त्यांनी येथे लिहिली. त्याच्या काही प्रती ते ज्या खोलीत बंदिवासात होते, तेथे जतन करण्यात आल्या आहेत. याचबरोबर त्यांनी दैनंदिन वापरलेल्या वस्तू, खुर्ची, टेबल, बिछाना, काही भांडी, त्यांनी लिहिलेली पत्रे येथे पहावयास मिळतात.सकाळी ७.३० ते ८ नाश्ता, दुपारी वाचन व लेखन, जेवणानंतर दुपारी बॅडमिंटन खेळणे, त्यानंतर पुन्हा वाचन व लेखन, व्यायाम, रात्री साडेआठला जेवण व नऊ वाजता झोपणे असा पंडितजींचा त्या वेळचा दिनक्रम होता.पंडित नेहरुंना नगरच्या किल्ल्यात बागकाम करण्याची आवड जडली. फुलांची आवड असल्याने ते सर्वात आधी उठून बागकामात रंगून जात. किल्ल्यातील अनेक झाडांचे त्यांनी जतन केले. नगरची बासुंदी आणि आंबेमोहोर तांदळाची त्यांना आवड होती. येथील मोतीलाल फिरोदिया हे त्यावेळी पंडितजींचे यजमान होते. ते पंडितजींसाठी ‘बंबईवाला’ यांची बासुंदी, तर भिंगार येथील मिश्रीलाल भंडारी यांच्या रेशनच्या दुकानांतील आंबेमोहोर तांदूळ किल्ल्यात पाठवत असत.

पंतप्रधान झाल्यानंतर दोनदा किल्ल्याला भेटआपल्या जीवनातील अडीच वर्षांचा काळ ज्या किल्ल्यात घालवला त्याच्या आठवणी पंडितजींच्या मनात कायम राहिल्या, म्हणूनच पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी १९५२ आणि १९६१ अशा दोन वेळी नगरला भेट दिली. या आपल्या भेटीत त्यांनी आवर्जून किल्ल्याला भेट देऊन आपली खोली, आपण घालवलेल्या ठिकाणची पाहणी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.