शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिव लोखंडेंचा विजयोत्सव

By admin | Updated: March 2, 2024 13:22 IST

श्रीरामपूर : शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या विजयासह देशभरातील मोदी लाटेच्या विजयाचा जल्लोष श्रीरामपुरात फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा करण्यात आला.

 श्रीरामपूर : शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या विजयासह देशभरातील मोदी लाटेच्या विजयाचा जल्लोष श्रीरामपुरात फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा करण्यात आला. दुपारी देशभरात भाजपाच्या विजयाचे कमळ फुलत असल्याचे वृत्त येत असताना भाजपाची निर्विवाद सत्ता येऊन नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीरामपूरच्या गांधी पुतळ्याजवळ भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत भर उन्हात फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. जिल्हा पदाधिकारी प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, माजी शहराध्यक्ष शशिकांत कडूस्कर, डॉ. शांतीलाल पाटणी, संजय पांडे, नगरसेविका भारती कांबळे, संजय यादव, गणेश राठी, अभिजित कुलकर्णी, सतीश नागरे, संदीप वाघमारे, रामदास धोत्रे, स्वप्निल सोनार, गणेश बिंगले, अविनाश कदम, विजय लांडगे, सोमनाथ पतंगे, विजय जैस्वाल, पंकज ललवाणी आदींनी गांधी पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची मनमुराद उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीनंतर लाल रंगाच्या उघड्या जीपमधून कार्यकर्त्यांनी शहरातून विजयी फेरी काढली. मोटारसायकल फेरीने शहराच्या वेगवेगळ्या भागात विजयोत्सव साजरा करण्यात आला. ज्याच्या त्याच्या तोंडातून मोदी मोदीचा नारा ऐकायला येत होता. महायुतीच्या कार्यकर्त्यांत या विजयामुळे एक चैतन्य संचारले आहे. (प्रतिनिधी) कोपरगाव : देशासह महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या यशाचा कोपरगावमध्ये जल्लोष करण्यात आला़ जागोजागी वाजंत्री व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ महाराष्ट्रात महायुतीने भरघोस यश मिळविले़ शिर्डी लोकसभा मतदारसंघात सेनेचे सदाशिव लोखंडे यांनी बाजी मारली़ लोखंडे हे आघाडीवर असतानाच कोपरगावमध्ये फटाके फोडण्यात आले़ भाजपाला पूर्ण बहुमत मिळते हे लक्षात आल्यावर आॅटोरिक्षा संघटनेच्या वतीने बस स्थानकासमोर मोफत चहाचे वाटप करण्यात आले़ तसेच आॅटोरिक्षा पतसंस्थेसमोर फटाके वाजविण्यात आले़ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ याशिवाय बाजारतळ, संभाजी महाराज पुतळा येथे भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला़ कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसींग मध्ये संचालक मंडळाने पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला़ यात भाजपाचे विजय वहाडणे, शहराध्यक्ष महावीर दगडे, विनायक गायकवाड, सुशांत खैरे, चेतन खुबानी, मनोहर कृष्णाणी, तसेच शिवसेनेचे राजेंद्र झावरे, उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, शहर प्रमुख भरत मोरे, असलम शेख, महेमूद सय्यद, संतोष होने, सनी वाघ, अंकुश वाघ, आदिनाथ ढाकणे, कलविंदर दढियाल आदी उपस्थित होते़ जिनिंग पे्रसिंगमध्ये विठ्ठलराव आसने, डॉ़ दिलीप जगताप, बोरावके, वल्टे, व्यवस्थापक कथले आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी) अकोले : पुरोगामी पट्ट्यात पुन्हा भगवे पीक आले असून, सेना-भाजपाच्या विजयाबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या यशामुळे भाजप-सेनेसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, माढा मतदारसंघातील सदाभाऊ खोत यांचा निसटता पराभव शेतकरी कार्यकर्त्यांना चटका लावून गेला. सत्तेची मस्ती जिरवण्यासाठी सामान्य मतदारांनी पुढाकार घेतल्याने देशात लुटारु हटाव मोहीम फत्ते झाली. विधानसभेतही अशाच बदलाची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी लोकमतला दिली. ‘आदिवासी भागातील लोकांनी बदलाच्या बाजूने कौल दिला ही बाब आशादायी असून सत्ता कोणाची मक्तेदारी नाही हे सामान्य जनतेने दाखवून दिले’ असे मधुकर तळपाडे यांनी सांगितले. लोकांना झुलवत ठेवत सदा सर्वकाळ फसवता येत नाही, सत्ताधार्‍यांना आत्मचिंतन करावयास लावणारी ही निवडणूक असून विधानसभेत यापेक्षा वेगळे चित्र अपेक्षित नाही, असे मत राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. वसंत मनकर यांनी व्यक्त केले. रामदास आठवले यांच्या पराभवाचा वचपा कार्यकर्त्यांनी काढला, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे राज्य संघटक विजय वाकचौरे यांनी व्यक्त केली. सायंकाळी भाजपाचे धनंजय संत, मच्छिंद्र मंडलिक, सीताराम भांगरे, दत्ता शेणकर, प्रमोद मंडलिक, रमेश राक्षे आदींसह अकोलेकरांनी विजयी मिरवणूक काढत आनंद साजरा केला. (तालुका प्रतिनिधी) आश्वी : शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अनुक्रमे सदाशिव लोखंडे व दिलीप गांधी यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करून आनंद साजरा केला. दोन्ही मतदार संघातील अटीतटीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून लोखंडे व गांधी समर्थकांमध्ये उत्सुकता होती. मताधिक्य वाढत जाताच आनंदाचे वातावरण पसरले. सायंकाळी दोन्ही उमेदवारांच्या विजयाची बातमी समजताच अर्बन बँकेसमोर साहेबराव ताजणे, मधुकर भगत, प्रशांत कोळपकर, गणेश गोसावी, कैलास लाहोटी, गोदू डागा आदींनी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)