शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल; देवगड येथे साध्वी प्रज्ञा सिंह यांची भविष्यवाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 14:00 IST

राष्ट्र भक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच. भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले.

नेवासा : राष्ट्र भक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच. भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. सोमवारी सायंकाळी ८ वाजता तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे जाऊन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळवारी सकाळी शनि शिंगणापूर येथील देवस्थानच्या होम कुंड येथे शनि अभिषेक केला. यावेळी त्यांच्यासमवेत अ‍ॅड. सुनील चावरे, हेमंत त्रिवेदी, डॉ. विक्रम चोभे, डॉ. अनुपा चौभे, प्रभाकर अंजुरकर, भगवान झा यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. देवगड येथे साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, तप्त असलेल्या भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल हे सत्य युगापासून सुरू आहे. महाराष्ट्र ही संत, राष्ट्भक्तांची व शिवरायांची भूमी आहे. संत हे सहनशील असतात. पण संत वचन हे देवाची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या याच भूमीत संतांना आणून त्रास दिला गेला. त्यामुळे त्या राज्यकर्त्यांचा नाश झाला. राष्ट्रभक्ती, देवभक्ती ही देवांची हत्यारे मानव जातीच्या, श्रृष्टी व धर्म रक्षणासाठी वापरली जातात. समाजाने सुद्धा ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपले सर्व जीवन राष्ट्रभक्तीसाठी व धमार्साठी अर्पण आहे. बाबरी पाडण्यासाठी ही मी होते. राम मंदिर निर्मितीसाठी ही आपण राहणारच असून राम मंदिर होणारच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्ञानेश्वरी वाचताना माझ्या जीवनातील अनेक प्रश्न सुटण्यास मला मदत झाली. तर देवगड येथील रम्यभूमी मला पुन्हा येथे येण्यास भाग पडणार आहे. मंगळवारी सकाळी शनि अभिषेक केल्यानंतर शनि चौथ-यावर जाऊन शनि दर्शन घेतले. शनिदेवाला तेल अर्पण केले. यावेळी देवस्थानाच्यावतीने जनसंपर्क कार्यालयात अध्यक्षा अनिता शेटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व शनि प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी विश्वस्त शालिनी लांडे, आदिनाथ शेटे, राजेंद्र लांडे, भागवत बानकर उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा