शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

जामखेडमध्ये महिलेवर वार करून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 19:30 IST

शहरातील कान्होपात्रा भागात महिलेवर चाकूने वार करून नंतर स्वत: त्याच घराच्या छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली

जामखेड : शहरातील कान्होपात्रा भागात महिलेवर चाकूने वार करून नंतर स्वत: त्याच घराच्या छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. जखमी महिला अत्यवस्थ असून, तिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली.शहरातील कान्होपात्रा येथील एका महिलेच्या घरात पहाटे सहा वाजण्यापूर्वी नितीन धोंडे (पूर्ण नाव नाही, वय ३४, रा. आष्टी, जि. बीड) यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. शुभांगी हिच्यावर चाकूने वार झाल्याने ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. नितीन धोंडे याने सदर तरुणीवर वार करून व नंतर त्याच घरात स्लँबच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली. गंभीर जखमी झालेल्या शुभांगीवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नंतर तिला पुढील उपचारासाठी नगरला हलविले. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.मयत नितीन धोंडे याच्या मृतदेहाचे जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. आष्टी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोकळे, पोलीस हेड. काँस्टेबल बापूसाहेब गव्हाणे करत आहेत. मयत नितीन धोंडे खासगी गुत्तेदार म्हणून काम करत होता, अशी माहिती मिळाली. घटनेचे निश्चित कारण अद्याप समजले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड