बोधेगाव : व्यंकटेश उद्योग समूह आपल्या कार्याद्वारे सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग दाखवून देत आहे. या संस्थेचे कार्य देदीप्यमान असून सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बळकटी देणारे आहे, असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
व्यंकटेश मल्टिस्टेटच्या दिनदर्शिका प्रकाशनानिमित्त नगर येथील मुख्य कार्यालयात कोपरगावचे विधानसभा सदस्य आशुतोष काळे यांनी नुकतीच भेट दिली. भेटीदरम्यान व्यंकटेश उद्योग समूहाच्या विविध कामांची माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सुरेश चव्हाण, डॉ. अविनाश मोरे, ख्यातनाम विधिज्ञ मनोज देशमुख, प्रा. गणेश देशमुख, युवा व्याख्याते गणेश शिंदे, डिझाईनर ज्ञानेश शिंदे, प्रसिद्ध खडू शिल्पकार अशोक डोळसे, गणेश दळवी, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुमित कुलकर्णी, योगेश बेळगे आदी उपस्थित होते. व्यंकटेश मल्टिस्टेटने अल्पावधीच नगर, जालना, बीड, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतील २२ शाखांच्या माध्यमातून जवळपास एक लाख सभासदांचे विस्तीर्ण जाळे विणले आहे. ग्राहकांना तत्पर व सुरक्षित सेवा देण्यासाठी संस्थेने डिजिटल बँकिंगचा वापर करून फिरते एटीएम, मोबाइल ॲप, इंटरनेट बँकिंग, आधार कार्डाच्या साहाय्याने पैसे काढणे, यूपीआय क्यूआर कोड आदी सुविधा निर्माण केल्या असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी व्यंकटेशचे संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे, उपाध्यक्ष व्यंकट देशमुख, संचालक अनिल गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे, फाउंडेशनचे मुख्य सहकारी संचालक ज्ञानेश झांबरे, इतर पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.