शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दहा टन लिंबू घेऊन निघालेले वाहन गायब : तिघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:43 IST

तालुक्यातील अरणगाव येथील गौरव लेमन कंपनीने 10 टन लिंबू भरून दिल्लीला पाठवलेले आयशर आठ दिवस होऊनही दिल्लीत न पोहचता प्रवासातच गायब होण्याची घटना उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यातील लिंबू उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

जामखेड : तालुक्यातील अरणगाव येथील गौरव लेमन कंपनीने 10 टन लिंबू भरून दिल्लीला पाठवलेले आयशर आठ दिवस होऊनही दिल्लीत न पोहचता प्रवासातच गायब होण्याची घटना उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यातील लिंबू उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.सहा लाख अठ्ठावीस हजार रुपये किंमत असलेल्या दहा टन वजनाच्या लिंबाची परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचे समोर आले असून याप्रकरणी पुणे येथील न्यू सुनिल ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या दोघा मालकांसह अज्ञात गाडी चालक अशा तिघांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील गोवर्धन पांडूरंग राऊत हे अरणगाव सह परिसरातील गावांमधील लिंबू उत्पादक शेतक-यांकडून गौरव लेमन कंपनी या आडत दुकानाच्या माध्यमांतून लिंबूची खरेदी करतात. १५ जून रोजी नेहमीप्रमाणे लिंबू व्यापारी राऊत यांनी आपल्या आडत दुकानात खरेदी केलेले लिंबू दिल्लीला पाठवण्यासाठी पुणे येथील न्यू सुनिल ट्रान्सपोर्टचे मालक सुनिल पांडूरंग वनवे यांना दुरध्वनी करून गाडी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार न्यू सुनिल ट्रान्सपोर्टकडून लिंबूचा माल घेऊन जाण्यासाठी आयशर गाडी ( युपी १७ टी १३४४ )अरणगावला त्याच दिवशी आली. १० टन लिंबू मालाचे बॉक्सचे वाहन दिल्ली येथील आझादपुर मार्केटमधील पी. एन. सन्स अ‍ॅण्ड कंपनीच्या दुकान नंबर ए - 250 मध्ये माल घेऊन जाणार होती. रात्री अकरा वाजता लिंबाने भरलेली गाडी घेऊन दिल्लीकडे रवाना झाला होता. दरम्यान १७ जून रोजी गौरव लेमन कंपनीचे मालक गोवर्धन राऊत यांनी दिल्लीस्थित पी. एन. सन्स अ‍ॅण्ड कंपनीकडे फोन करून विचारणा केल्यानंतर अजूनपर्यंत आमच्याकडे गाडी पोहच झाली नसल्याची माहिती राऊत यांना दिली. दरम्यान व्यापारी गोवर्धन राऊत यांनी जामखेड पोलिस स्टेशन तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. न्यू सुनिल ट्रान्स्पोर्ट कंपनीचे मालक पांडुरंग वनवे, सुनिल वनवे व अज्ञात गाडीचालक यांनी दिल्ली येथील व्यापार्याकडे घेऊन न जाता संगनमत करून गायब करून गोवर्धन राऊत यांची फसवणूक करून आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड