शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

स्वर्णिम विजय वर्षानिमित्त लष्कराचे विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST

अहमदनगर : १९७१ च्या भारत-पाक युद्धातील विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष भारतात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे ...

अहमदनगर : १९७१ च्या भारत-पाक युद्धातील विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष भारतात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्त अहमदनगरच्या एसीसी अ‍ॅण्ड एस व एमआयआरसी या लष्करी प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दरम्यान, दिल्ली येथून निघालेली मशाल रॅली शुक्रवारी नगरमध्ये दाखल झाली. लष्कराकडून या मशालीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकवर विजय मिळविला व बांगलादेशाची स्थापना झाली. या विजयाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने भारतात ३ डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वर्णिम विजय वर्ष साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील अमर ज्योतीमधून चार मशाली देशाच्या विविध भागात रवाना करण्यात आल्या आहेत. त्यातील दक्षिण भारतात नगरमार्गे जाणारी विजय मशाल २९ जानेवारी रोजी नगरमध्ये दाखल झाली. औरंगाबाद रोडवरून आलेल्या या मशालीचे नगरच्या सैनिकांनी स्वागत केले. डीएसपी चौकातून जिल्हा न्यायालय, एसीसी अ‍ॅण्ड एस सेंटर, भूईकोट किल्ला, चांदणी चौक व तेथून पुढे सोलापूर रोडने ही मशाल एमआयआरसीच्या युद्धस्मारकापर्यंत गेली. या मशाल यात्रेत सैनिक पायी, सायकल, तसेच घोड्यावर स्वार होऊन सहभागी झाले होते. १९७१च्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले माजी ब्रिगेडिअर आर. एस. रावत यांच्याकडे एमआयआरसीत मशाल सुपुर्द करण्यात आली. रावत यांच्यासह एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर विजय सिंह राणा यांनी १९७१च्या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

--------------

बांगलादेशी अधिकारीही सहभागी

भारताने बांगलादेशाला हे युद्ध जिंकून दिल्याने मित्रराष्ट्र म्हणून अनेक बांगलादेशी अधिकारी नगरच्या एमआयआरसीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या बांगलादेशी अधिकाऱ्यांनी मशालीसह युद्धस्मारकावर शहिदांना मानवंदना दिली. ही विजय मशाल ४ फेब्रुवारीपर्यंत येथील युद्धस्मारकावर राहणार आहे.

--------------

माजी सैनिकांचा गौरव

दुसऱ्या दिवशी (३० जानेवारी) एमआयआरसीमध्ये १९७१ युद्धातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा गौरव करण्यात आला. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडंट मेजर जनरल एस. झा व एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर विजय सिंह राणा यांच्या हस्ते वीरपत्नी, वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले निवृत्त मेजर जनरल मलिक, ब्रिगेडिअर रावत, ले. कर्नल अनंत गोखले यांनी युद्धातील आठवणींना उजाळा दिला. बांगलादेश लष्कराचे कॅप्टन एहसान यांनी १९७१च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सशस्त्र सेनेने निभावलेली निर्णायक भूूमिका व त्यामुळे दोन्ही राष्ट्रांत सध्या असलेले मैत्रीचे संबंध याचा विशेष उल्लेख केला.

--------------

फोटो - ३०एमआयआरसी १ व २

१९७१ च्या युद्ध विजयाप्रित्यर्थ दिल्लीतून आलेल्या मशाल यात्रेचे नगरमध्ये लष्कराने स्वागत केले. त्यानंतर एमआयआरसीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांकडून वीरपत्नी, वीरमातांचा सन्मान करण्यात आला.