घारगाव : बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही. बिनविरोध ग्रामपंचायतींकरिता निधी जाहिर केल्यानंतर हा निधी कोठून देणार? अशी चर्चा केली गेली. मात्र, आधीच्या आमदाराला निधी कोठून येतो, हे कळालेच नाही. अशी टिका अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी माजी आमदार, भाजपचे नेते वैभव पिचड यांचे नाव न घेता केली संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध झाले. शनिवारी (दि. ३०) या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आधीच्या आमदाराला निधी कोठून येतो, हे कळालेच नाही - आमदार किरण लहामटे यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 06:44 IST