शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

युपीएससीत पारनेरचा झेंडा

By admin | Updated: June 15, 2014 00:31 IST

पारनेर : दुष्काळी तालुका व राज्याला गुरुजी पुरविणारा तालुका अशी राज्यात ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्याच्या शिरपेचात प्रशांत सुंबे, गणेश पोटे, योगेश उंडे, संदीप साठे, ऋषीकेश खिलारी या

पारनेर : दुष्काळी तालुका व राज्याला गुरुजी पुरविणारा तालुका अशी राज्यात ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्याच्या शिरपेचात प्रशांत सुंबे, गणेश पोटे, योगेश उंडे, संदीप साठे, ऋषीकेश खिलारी या युवकांनी मानाचा तुरा खोवला आहे़ युपीएससी परीक्षेत एकाचवेळी पाच आय.ए.एस .अधिकारी देण्याचा इतिहास त्यांनी घडविला असून राज्यातील पारनेर हा पहिलाच तालुका ठरला आहे.पारनेर तालुक्याची ओळख राज्याला दुष्काळी तालुका म्हणून आहे. त्यानंतर राज्याला सर्वाधिक शिक्षक पुरविणारा तालुका म्हणून गणना केली जाऊ लागली. पण गुरुवारी दुपारी देशातील प्रमुख शासकीय सेवेची परीक्षा असणाऱ्या युपीएससी परीक्षेत प्रशांत सुंबे (पाडळी आळे), योगेश उंडे (कर्जुले हर्या), गणेश पोटे (राळेगणसिध्दी), संदीप साठे (हंगा), ऋषीकेश खिलारी (टाकळी ढोकेश्वर) यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. आणि त्यांचे आय.ए.एस. होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पारनेरला न्यु इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षण घेतलेला प्रशांत सुंबे याने इलेक्ट्रीक व टेलीकम्युनिकेशन इंजीनीअरींगचा अभ्यास पूर्ण करतानाच युपीएससीकडे लक्ष दिले. पुण्यात अभ्यास करुन त्याने यश मिळविले. पारनेर एस.टी. आगारात मॅकेनिक असणारे आप्पासाहेब व आई मीरा यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रशांत सांगतो. तर योगेश उंडे हा कर्जुले हर्या येथील हरेश्वर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे़ प्रवरानगरला इलेक्ट्रीक व टेलीकम्युनिकेशन इंजीनीअरींगचा अभ्यास पूर्ण करुन त्याने हे यश मिळविले. वडील पांडुरंग हे बीएसएनएलमध्ये सेवेत आहेत. आई नंदा यांचे स्वप्न त्याने पूर्ण केले़ स्टेट बँकेतील अधिकारी त्याचे काका रामदास उंडे व मुख्याध्यापक अशोक बोंदाणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे योगेश ने सांगितले. राळेगणसिध्दीचा गणेश पोटे याचे उदाहरण वेगळेच आहे. राळेगणसिध्दीच्या नापासांच्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर एम.बी.बी.एस. केले़ उपजिल्हाधिकारी झाला. सध्या तो अकोला जिल्ह्यात कार्यरत होता. आता त्याचे आय.ए़एस.चे स्वप्न पूर्ण झाले. वडील संपत पोटे व त्याच्या आईचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे. शिवाय अण्णा हजारेंचा आदर्श समोरच होता. हंगा येथील संदीप प्रदीप साठे यानेही एम.बी.बी.एस. पूर्ण केल्यानंतर हे यश मिळविले. वडील प्रदीप सोलापूर महापालीकेत उपायुक्त आहेत़ आई सुनीता यांचेही मार्गदर्शन लाभले. ऋषीकेश खिलारी हा टाकळी ढोकेश्वरचा. पण सध्या त्याचे वास्तव्य राहुरी तालुक्यात आहे.