शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत बेघरांसाठी प्रशासनाकडून अद्यावत निवारागृह; अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:09 IST

स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्तींसाठी  प्रशासनाने निघोज येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या साई पालखी निवारा येथे निवारागृह सुरू केले आहे. सोमवारी (३० मार्च) सायंकाळपर्यंत या निवा-यात ६२ जणांना पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

शिर्डी : स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्तींसाठी  प्रशासनाने  निघोज येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या साई पालखी निवारा येथे निवारागृह सुरू केले आहे. सोमवारी (३० मार्च) सायंकाळपर्यंत या निवा-यात ६२ जणांना पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.    लॉकडाऊनमुळे  शिर्डी शहर परिसरात अडकलेल्या, स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय देखभाल या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिर्डीत बेघर, बेरोजगार कामगार, कचरा वेचक, भिक्षेकरी आदी गरजुंना संस्थानकडून बसस्थानकात दोन वेळचे जेवण देण्यात येत होते. मात्र या कामगारांच्या स्वच्छतागृहांचा व व्यक्तीगत स्वच्छतेचाही प्रश्न होता. यामुळे सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येणाची शक्यता होती़ चार दिवसात येथे जेवणारांची संख्या पंधरा वरून चारशेवर पोहचली होती.    या पार्श्वभूमीवर चिंतीत झालेल्या प्रांताधिकारी गोविंद शिंद ेयांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपंचायत मुख्याधिकारी सतिष दिघे, प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांच्याशी विचारविनीमय करून या बेघर लोकांना बंदिस्त जागेत ठेवून सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी साईपालखी निवारा यांच्या व्यवस्थापनाला विनंती करण्यात आली.  आजवर पायी येणा-या पदयात्रींना विनामूल्य भोजन व निवास व्यवस्था पुरवणारा साई पालखी निवारा व्यवस्थापनाने मानवतेच्या भावनेतून सहर्ष अनुमती दिली. येथे या लोकांची उत्तम व्यवस्था होणार आहे. मात्र  त्यांना प्रशासनाच्या अनुमतीशिवाय बाहेर पडता येणार नाही. या लोकांना ठेवण्यासाठी संस्थेचे दोन मोठे हॉल अधिगृहीत करण्यात आले आहेत. यामुळे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.बेघर व स्थलांतरीत होत असलेल्या लोकांना येथे ठेवण्यात येणार आहे. साईबाबा संस्थान येथे दोन वेळचे जेवण पुरविणार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने ६२जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना या निवारा केंद्रात दाखल केल्याचे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीcorona virusकोरोना वायरस बातम्या