शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या वाहिन्या

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत.

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत. बदलत्या हवामानामुळे कमी झालेल्या पावसामुळे एकीकडे धरणं भरण्याची चिंता असताना दुसरीकडे मात्र आहे त्या पाण्याचा अपव्यय होत आहे.गुरुवारी (दि.३०) जागतिक काटकसर दिन आहे. पाण्याची काटकसर आता काळाची गरज बनली आहे. आगामी युद्ध पाण्यावरच होईल, अशी भाकिते तज्ज्ञांनी वर्तविली आहेत. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्याचा हिवरेबाजारचा प्रयोग देशाला पथदर्शी ठरला आहे. मात्र हिवरेबाजारपासून जवळच असलेल्या नगर शहरात मात्र पाण्याचा अपव्यय होतो आहे. मुळा धरणातून शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. ३५ वर्षांपूर्वीची जलवाहिनी असल्याने तिला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. या गळतीमध्येच १५ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे. जलवाहिनीला असलेली गळती रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. शहरातील पाणी वितरण व्यवस्था अत्यंत जुनी आहे. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे. नगरोत्थान योजनेतील पाणी वितरण व्यवस्था सदोष आणि अपूर्ण असल्याने पाण्याची गळती रोखण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप अपयशच आल्याचे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरून दिसते आहे.शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावरून गटारीत जाते आहे. फुटक्या जलवाहिन्यांमुळे नागरिक जलवाहिनीखाली कपडे धूत आहेत. अनेक ठिकाणचे कारंजे उडत असून त्याद्वारेही पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पाणी रोखण्याची गरज आहे.शहरात सध्या दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे एकप्रकारे पाण्याची बचतच केली जात आहे. दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी नळाला तोट्या नसल्याने पाणी वाया जात आहे. त्यावर आगामी काळात कारवाई केली जाईल,असे मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)