शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

महापालिकेचे बेकायदेशीर विषय रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:28 IST

स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांना मंजुरी दिल्यानंतर त्यासोबत ‘तसेच’ हा शब्द जोडून इतर विषय मंजूर ठरावात बेकायदेशीरपणे घुसडले जातात.

अहमदनगर : स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांना मंजुरी दिल्यानंतर त्यासोबत ‘तसेच’ हा शब्द जोडून इतर विषय मंजूर ठरावात बेकायदेशीरपणे घुसडले जातात. त्यामुळे सदरचे विषय बेकायदेशीरपणे मंजूर होऊन त्याची प्रत्यक्ष कार्यवाही होते. यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून मोठा व्यवहार होतो, तर महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. अशा बेकायदेशीरपणे मंजूर केलेल्या विषयांची आधी चौकशी करून नंतर ते रद्द करणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली.महापालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी दुपारी एक वाजता सभा झाली. सभेमध्ये तब्बल २० विषय मंजुरीसाठी होते. यामध्ये २९ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय होता. यावर विरोधी पक्षनेते तथा स्थायी समितीचे सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी इतिवृत्त मंजुरीस आक्षेप घेतला.कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांवर चर्चा करून ते मंजूर केले जातात. त्या विषयांना जोडून काही विषय बेकायदेशीरपणे मंजूर झालेल्या ठरावात घुसडले जातात. असे विषय तत्काळ रद्द करण्याची मागणी बोराटे यांनी लावून धरली. २०१७ मध्ये स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव होत्या. त्यांचा सगळा रोख जाधव यांच्या दिशेने होता. यावेळी बोराटे यांनी बेकायदेशीरपणे घुसडलेल्या विषयांचे सभागृहात वाचन केले. त्यामध्ये चंद्रमा महिला स्वयंसहायता बचत गटाला सिद्धीबागेत मत्स्यालय, फुलराणी पाच वर्षे खासगी तत्त्वावर चालविण्यास देणे, २०१७-१८ मध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यास बेकायदेशीर मुदतवाढ देणे, प्रोग्रेसिव्ह या शैक्षणिक संस्थेला आठ खोल्या ११ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देणे, मातोश्री प्रतिष्ठान यांना व्यवसायासाठी अग्निशमन दलाशेजारील जागा भाडेतत्त्वावर देणे आदी विषय होते. यासह आणखी काही विषय ठरावात घुसडण्यात आले होते.सदरचे विषय तत्काळ रद्द करा, ठराव विखंडित करण्याची मागणी बोराटे यांनी लावून धरली. मात्र याबाबत चौकशी करून नंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन सभापती वाकळे यांनी दिले.बेकायदेशीर विषय शासनाकडेस्थायी समिती, सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तामध्ये कार्यक्रमपत्रिकेवर नसलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली असेल तर असे विषय राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. बेकायदेशीर ठराव शासनाकडूनच विखंडित करण्यात येणार आहेत. स्थायी समितीमध्ये मंजूर झालेले बेकायदेशीर विषय शासनाकडे पाठविले जातील, असे नगरसचिव एस. बी. तडवी यांनी सभागृहाला सांगितले. अशा बेकायदेशीर विषयांबाबत शासनाकडे चौकशी सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.नलावडे यांनी दिले बल्ब भेट

नगरसेविकांनी मागणी केल्यानुसार पथदिवे दुरुस्त केले जातात. स्टोअर विभागातून नवे दिवे घेतले जातात, प्रत्यक्षात जुने दिवे बसविले जातात. एक दोन दिवसांत ते बंद पडतात. त्यामुळे आता आम्हीच इलेक्ट्रील मटेरिअल देतो, तुम्ही किमान कामे तरी करा, हे सांगण्यासाठी भाजप नगरसेविका उषाताई नलावडे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाºयाला चक्क नवा बल्ब भेट देऊन स्थायी समितीच्या सभेत गांधीगिरी केली. दरम्यान विद्युत विभागात मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरूच असल्याचा आरोप नलावडे यांनी केला. तर विद्युत विभागात काम न करणाºया वायरमनला कामावरून काढून टाकण्याचा आदेश सभापती वाकळे यांनी दिला. दरम्यान कामचुकार कर्मचाºयांना नोटिसा बजावल्याचे विद्युत विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.असे झाले निर्णय...........श्वान पकडण्याचा वेग वाढविणारमोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाईउद्यानप्रमुख उद्धव म्हसे यांना समज२३ उद्याने विकसित करण्यास मंजुरीखतनिर्मिती व इंधननिर्मिती प्रकल्पास मान्यता१४५० रुपये प्रतिटन खतविक्रीस मंजुरीस्वच्छता आराखड्याबाबत पाठपुरावा करणारअमृत योजनेतील सौरप्रकल्प मार्गी लावणार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका