शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी रक्तदान करुन अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 16:06 IST

देवदैठण येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले.

देवदैठण : देवदैठण (ता. श्रीगोंदा)-पाडळी (ता. पारनेर) रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने देवदैठण येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले.देवदैठण व पाडळी रांजणगाव या दोन गावांना जोडणा-या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक वर्षापासून रस्त्याची दुरवस्था असून दुरुस्तीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही, असे म्हणत देवदैठणच्या ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. सोमवारी सकाळी ३० तरुणांनी रक्तदान केले. अशा आंदोलनानंतरही प्रशासन ऐकणार नसेल तर २० फेब्रुवारीपासून रास्ता रोको, बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.विश्वास गुंजाळ, वसंत बनकर, निलेश गायकवाड, विजय कोकाटे, रवींद्र ढवळे, संतोष वेताळ, सुरेश उबाळे आदींसह गावक-यांनी रक्तदान करून आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.देवदैठण ग्रामस्थांचे निवेदन मिळाले. या रस्त्यासाठी विशेष लक्ष घालून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामस्थांनी संयम राखावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते यांनी सांगितले. अनेक वर्षापासूनची आमची रस्ता डांबरीकरणाची मागणी आहे. राजकीय नेते, प्रशासनाकडून नुसतेच आश्वासन मिळते. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष घातले नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देवदैठणच्या उपसरपंच जयश्री गुंजाळ, पूजा बनकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षाBlood Bankरक्तपेढीStrikeसंप