शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील १८ कृषिसेवा केंद्रांत विनापरवाना कीटकनाशके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 10:51 IST

कीटकनाशकांसह इतर कृषी उत्पादकांच्या विक्रीबाबतच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कीटकनाशकेदर्जेदार असले तरी विक्री करताना त्याचा परवाना कृषिसेवा केंद्रचालकाकडे असणे बंधनकारक आहे.

अहमदनगर : कृषिसेवा केंद्रांतून विक्री होणा-या कीटकनाशकांची तपासणी कृषी विभागाने सुरू केली असून, जिल्ह्यातील १८ कृषिसेवा केंद्रांत विनापरवाना कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे़ उगमप्रमाणपत्रात समावेश नसलेल्या कीटकनाशकांची विक्री कृषी विभागाकडून थांबविण्यात आली आहे. बंदी घातलेल्या कीटकनाशकांची किंमत काही लाखांच्या घरात आहे.यवतमाळ येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने कृषिसेवा केंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. कीटकनाशकांसह इतर कृषी उत्पादकांच्या विक्रीबाबतच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कीटकनाशकेदर्जेदार असले तरी विक्री करताना त्याचा परवाना कृषिसेवा केंद्रचालकाकडे असणे बंधनकारक आहे. कृषिसेवा केंद्र सुरू करण्यास किंवा नूतनीकरणाचा परवाना कृषी विभाग देत असते़ या परवान्यात ज्या कीटकनाशकांचा समावेश नाही, अशी कीटकनाशके विक्री करता येत नाहीत. शासनाच्या आदेशानुसार उगमप्रमाणपत्र आणि प्रत्यक्षात विक्री होणा-या कीटकनाशकांची तपासणी निरीक्षकांमार्फत करण्यात येत आहे. तालुका कृषी निरीक्षकांनी केलेल्या तपासणीचा अहवाला नुकताच जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. गेल्या महिनाभरात केलेल्या तपासणीत १८ कृषिसेवा केंद्रांतून परवाना नसलेली कीटकनाशके विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. या कीटकनाशकांचा साठा बाजूला ठेवून तो विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.कीटकनाशकांसोबत विक्री केल्या जाणा-या संजिविकांच्या विक्रीवरही बंदी आहे. कीटकनाशके आणि त्यासोबत दिली जाणारी संजिविके याचीही तपासणी सुरू आहे. कृषिसेवा केंद्रांमागे तपासणीचे शुक्लकाष्ठ लागले आहे. कृषिसेवा केंद्रचालकांकडे मोजकेच कीटकनाशके विक्रीचा परवाना असतो. प्रत्यक्षात मात्र ते अनेक कंपन्यांचे कीटकनाशके विकतात. त्यामुळे कीटकनाशकांच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नव्हते़ त्यावर नियंत्रण आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ त्याचाच एक भाग म्हणून ही तपासणी करण्यात येत आहे, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सहा कृषिसेवा केंद्रांत कीटकनाशके विक्रीस बंदी

कोपरगाव, नगर, काष्टी, नाटेगाव, चासनळी, कोपरगाव शहर, बेलापूर, जामखेड आदी ठिकाणांच्या कृषिसेवा केंद्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद