शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड येथील दुहेरी हत्याकांड खटल्यात उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती, राजकीय वैमनस्यातून झाली होती दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 21:28 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या युवकांची भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे. 

अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या युवकांची भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे. उल्हास माने यांच्या तालिमीतील काही मुले आणि मयत योगेश आणि राकेश यांचा वाद झाला होता. या वादातून जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ मध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, उल्हास माने, त्याचा बंधू, दत्ता ऊर्फ स्वामी गायकवाड या सर्वांनी इतर आरोपींच्या सहाय्याने या दुहेरी खुनाचा कट रचला. त्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडून दोघांची निर्घृण हत्या केली होती. या दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या माने बंधूंनी जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. या घटनेचे स्वरूप अणि माने बंधू यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी एक वर्षाच्या आत निकाली करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. 

या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने प्रसिद्ध वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. या संबंधीची अधिसूचना नुकतीच विधी आणि न्याय विभागाने जारी केली आहे. यादव यांच्या नियुक्तीबद्दल पीडित राळेभात कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करून या प्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. याबाबत यादव यांच्याशी संपर्क साधला असता १० जुलै रोजी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयात या खटल्याबाबत सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय