वाळकी : नगर तालुक्यातील उक्कडगाव ग्रामस्थांच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिर उभारणीसाठी २५ हजार ७५० रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. मदतीच्या रकमेचा धनादेश ग्रामस्थांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, प्रचारक किरण काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी वाणीभूषण दादा महाराज शेळके, पोलीस पाटील रामदास शेळके, ज्ञानेश्वर महाराज मस्के, विठ्ठल उकिरडे, राधाकृष्ण तिपोळे, शिवाजी मस्के, आंबादास शेळके, प्रा. विठ्ठल मस्के, प्रकाश शेळके, एकनाथ म्हस्के आदी उपस्थित होते.
उक्कडगावकरांचा राम मंदिरासाठी २५ हजारांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST