शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नगरमधील दोन मंदिरे जमीनदोस्त; पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 19:54 IST

कल्याण रोडवरील दोन मंदिरांवर महापालिकेने गुरुवारी पहाटेच्या सुमारास हातोडा टाकला. कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कारवाईला विरोध करणा-या हिंदू राष्ट्रसेनेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

अहमदनगर : कल्याण रोडवरील दोन मंदिरांवर महापालिकेने गुरुवारी पहाटेच्या सुमारास हातोडा टाकला. कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कारवाईला विरोध करणा-या हिंदू राष्ट्रसेनेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील दुस-या टप्प्यातील कारवाईला गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारस सुरूवात झाली. नगर-कल्याण रोडवरील दिनेश हॉटेल व जाधव पेट्रोल पंपाजवळील लक्ष्मी माता व मोहटादेवी मंदिर अशी दोन धार्मिक स्थळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात हटविली. पहिल्या टप्प्यात २९ सप्टेंबर २००९ नंतरची ४ धार्मिक स्थळे ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी हटविण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.२) पहाटे दुस-या टप्प्यातील कारवाई सुरू झाली. दुस-या टप्प्यात रस्त्याला अडथळा ठरणा-या, फूटपाथवरील १९६० नंतर बांधकाम झालेल्या ६८ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. महापालिका उपायुक्त विक्रम दराडे, अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, सहायक नगररचनाकार कल्याण बल्लाळ यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पथकाने कल्याण रोडवरील लक्ष्मी माता व मोहटादेवी अशी दोन छोटी मंदिरे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. मंदिरातील मूर्ती विधिवत पूजा करून ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने मंदिर पाडण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, कोतवालीचे अभय परमार, दंगल नियंत्रण पथकासह १०० पोलिसांचा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता. कारवाईला विरोध करण्यासाठी आलेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.बुधवारी रात्री १० वाजल्यापासूनच ७० ते ८० मनपा कर्मचारी व अधिकारी बंदोबस्त मिळण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. मात्र पहाटे दोन नंतर प्रत्यक्ष बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर पथके कारवाईसाठी रवाना झाली.

नियोजन कोलमडले

आधीच बंदोबस्तासाठी झालेला उशीर आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी महापालिकेच्या ताफ्यातील वाहनात झालेला बिघाड, जेसीबीवरील अप्रशिक्षित चालक यामुळे कारवाईला उशीर झाला. तीनवेळा चालक बदलला तरी जेसीबी कार्यान्वित झाला नाही.चार ते पाच स्थळांवर असलेले कारवाईचे नियोजन कोलमडले व दोन स्थळावर कारवाईकरून कारवाई आटोपण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसारच कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही मंदिरांबाबत आक्षेप असून त्याबाबत समितीकडून विचार सुरू असल्याचे अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका