शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद,कोतवाली पोलिसांची कामगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 18:44 IST

अहमदनगर : अनेक गुन्ह्यांत समावेश असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना शनिवारी यश आले. त्यांच्यावर नगरसह औरंगाबाद, बीड जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.

अहमदनगर : अनेक गुन्ह्यांत समावेश असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना शनिवारी यश आले. त्यांच्यावर नगरसह औरंगाबाद, बीड जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.संतोष नंदू भोसले (वय १९) व काळू निलगिऱ्या भोसले (वय ३०, दोघे रा. वाळुंज पारगाव, ता. नगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. चंदन इस्टेट (माणिक नगर) येथील बंद बंगल्यातून घरगुती साहित्य चोरी झाल्याची फिर्याद सुमित संतोष वर्मा यांनी २४ जून २०१९ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस त्या चोरीतील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, याच चोरीतील हे आरोपी नगर-जामखेड रोडवरील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दि. १३ जून रोजी अंभोरा चेक पोस्टवर सापळा लावला. काही वेळाने हे दोघे आरोपी तेथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तसेच नगर शहरात इतर ठिकाणी गुन्हे केल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांच्यावर अंभोरा पोलीस ठाणे (ता. आष्टी), गंगापूर, पैठण (जि. औरंगाबाद) येथेही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.-------