लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील नटराज हॉटेल व जैन पितळे बोर्डाच्या इमारतीतील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण नगर शहरात १२ मार्च रोजी आढळला होता. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बुथ हॉस्पीटलमध्ये पहिले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. हे रुग्णालय कमी पडू लागल्याने महापालिकेने आनंद लॉन, तंत्रनिकेतन महाविद्यालय, नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डींग आणि एम्स रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले होते. रुग्णसंख्येत घट झाल्याने हे सेंटर बंद करण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, महापालिकेने नटराज हॉटेल व जैन पितळे बोर्डींगच्या इमारतीतील कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटरसाठी आरोग्यसेविकांची भरती करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
...
शहरात दररोज ५० नवीन रुग्ण
नगर शहरात दररोज सुमारे ५० रुग्णांची भर पडत आहे. यामध्ये दररोज ४ ते ६ रुग्णांची वाढत आहेत. मंगळवारी सर्वाधिक ५९ रुग्ण आढळून आले होे. वाढत्या रुग्णांची संख्या नगरकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
.....
शहरात सुरू होते ५७ कोविड केअर सेंटर
मागील सहा महिन्यांत ५७ कोविड केअर सेंटर सुरू होते. रुग्णसंख्येत घट झाल्याने ते बंद करण्यात आले होते. परंतु, रुग्ण संख्या वाढू लागल्याने महापालिकेने शहरातील नटराज हॉटेल व जैन पितळे बोर्डींग सुरू करण्यात येणार आहे.
....
एकूण रुग्ण संख्या
२१, १०४
...
मृत संख्या
४१०
...
उपचार घेत असलेने रुग्ण- २१२
......
- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेचे नटराज हॉटेल व जैन पितळे बोर्डींग, असे दोन कोविड केअर लवकरच सुरू करण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार खासगी रुग्णांना परवानगी दिली जाईल.
- डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी
---
(डमी आहे)