श्रीगोंदा : मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन दत्तात्रय बारगुजे (वय ३५) व अशोक नारायण पवार (वय ४९, रा.घोटवी, ता. श्रीगोंदा) हे जागीच ठार झाले. अहमदनगर-दौड रोडवर हा अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चिखली शिवारात अग्रवाल कंपनीच्या डेपोजवळ झाला.सचिन बारगुजे व अशोक पवार हे नगरला कांदा विकण्यासाठी गेले होते. नगरला कांदा विकून घरी परतत असताना चिखली शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकल जोराची धडक दिली. त्यात बारगुजे, पवार हे दोघे जागीच ठार झाले. या घटनेने घोटवी परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी भेट घेऊन पाहणी केली. अपघातानंतर वाहन फरार झाले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नगर-दौंड रस्त्यावर मोटारसायकल अपघात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:02 IST