शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्यात दोन जखमी; तीन गायींवरही हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:36 IST

बिबट्याने हल्ला करुन दोन व्यक्ती व तीन गायींना जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

अहमदनगर/ म्हैसगाव : बिबट्याने हल्ला करुन दोन व्यक्ती व तीन गायींना जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

मच्छिंद्र दुधावडे, तावजी केदार  अशी बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.  घरासमोर बांधलेल्या पाळीव गायावर बिबट्याने हल्ला केला. या हल्याने गायींचा व महिलांचा ओरडण्याचा आवाज आला.  आवाज ऐकून शाळेजवळ शेकत असलेले मच्छिंद्र दुधावडे हे घराकडे  आले. त्यांनी मोबाईलच्या उजेडात बिबट्या गायींवर हल्ला करीत असल्याचे पाहिले. त्यांनी आरडाओरडा करून त्यांनी बिबट्याला पळवून लावले.

या दरम्यान घरातुन बॅटरी घेवून उजेडात बिबट्या कुठे दिसतो काय? हे पाहत असताना बिबट्याने मागे फिरुन दुधावडे यांच्यावर हल्ला केला. प्रसंगअवधान राखत त्यांनी हात पुढे करून छातीवर होणार हल्ला हातावर घेतला. त्यांचा हाताला बिबट्याने जोरदार चावत हात पकडून ठेवला. त्याही परिस्थितीमध्ये दुधावडे यांनी बिबट्याची मान एका हाताने दाबत जबड्यातील हात मोकळा करुन घेतला. संधी मिळताच दुधावडे यांनी जीव वाचवून घरात गेले. याच आवाजाने जवळ राहणारे तावजी केदार मदतीसाठी येत असताना बिबटयाने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या पोटालाही जखमा झाल्या.

  हल्ल्यात जखमींवर ताहराबाद येथे डॉ. जालिंदर घिगे यांनी जखमीवर प्रथम उपचार केले. मंगळवारी सकाळी रुग्णालय उघडल्यावर पुढील उपचार करण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरleopardबिबट्याforest departmentवनविभाग